गीलोरी पाटीजवळ भीषण अपघात,एक जण ठार,तीन जण जखमी
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली-सेनगांव महामार्गावरील गीलोरी पाटीजवळ एका चार चाकी वाहनांचा अपघात होऊन या भीषण अपघातामध्ये एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.तसेच हा अपघात एवढा भीषण होता की हि गाडी रोडच्या साईडला असलेल्या सोयाबीनच्या शेतामध्ये पलट्या घेत कोसळली आहे.
मात्र दुर्दैवाने या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.सदर अपघातातील गाडी क्रमांक एम एच 20 एफ वाय 59 01 असून सदर मयत व्यक्तीचे नाव संदीप वानखरे असल्याची माहिती नरसी नामदेव पोलिसांकडून प्राप्त झाले असून या प्रकरणाचा तपास नरसी नामदेव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती आज दिनांक 3 जुलै रोजी प्राप्त झाली आहे.
0 टिप्पण्या