Ticker

6/recent/ticker-posts

आज दहावीच्या २६ हजार विद्यार्थ्यांचा निकाल होणार जाहीर

आज दहावीच्या २६ हजार विद्यार्थ्यांचा निकाल होणार जाहीर


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक न शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २५ हजार ९१५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये नियमित व रिपिटर विद्याथ्र्यांचा समावेश आहे. यंदा दहावीच्या परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरु झाल्या आणि ४ एप्रिल २०२२ रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. याअंतर्गत बहुतांश परीक्षांची पहिली शिफ्ट सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत सुरु होती. तर दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी ३ ते ६.३० अशी होती. दहावीच्या परीक्षेसाठी २५ हजार २२१ नियमित विद्यार्थी तर ६९४ रिपिटर असे एकूण २५ हजार ९१५ विद्यार्थी बसले होते. परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना जवळपास आठ दिवसांनी शाळेत मुळ गुणपत्रिका वाटप करण्यात येईल.


चला तर मग जाणून घेऊया या वेबसाईट्सवर बघता येईल निकाल mahresult.nic.in किंवा 

दहावी निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा लिंक  mahahsscboard.maharashtra.gov.in. दहावी बारावी निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा लिंक  sscresult.mkcl.org.




महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या