विष्णुपंत खेंडकर विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
जुने शहर सरस्वती नगरस्थित विष्णुपंत खेडकर विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. जुन्या शहरात १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी ५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट झाली होती, त्यामधून २८ विद्यार्थीनी ८० टक्क्यांवर वर गुण मिळवून प्रावीण्य प्राप्त केलेले आहेत. तसेच प्रथम श्रेणीमधे १९ विद्यार्थी पास झाली आहेत यंदा दहावी परीक्षेत शाळेतुन मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मरली आहे. परंतु शाळेतुन प्रथम येण्याचा मान मुलाला मिळाला आहे. सदर शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम गौरव गौतम खंडारे- 91%, द्वितीय आदित्य विजय इंगळे- 90.60%, तृतीय प्रिया भगवान आहेर- 90.40%, व श्रेया मनिष इंगळे- 90.20%, तर अनन्या सदानंद निकामे- 88.80%, धनश्री सतीश मोडके- 88.60%, यश सुभाष गीते- 88.20% यांनी 80 टक्केच्यावर गुण मिळविले आहेत.
अशा पध्दतीने शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब खेंडकर, मुख्याध्यापक निलेश खेंडकर, यमुनाबाई खेडकर प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर, शाळेच्या कोशाध्यक्ष मृणालीनी खेंडकर, सहसचीव अस्मिता खेंडकर तर शिक्षक प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत व गोपाल वानखडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. १०० टक्के निकाल लागण्यासाठी शाळेमधे तज्ञ शिक्षकवृंद, सुसज्ज वर्गखोल्या व प्रयोगशाळा, ग्रंथालय, अद्ययावत सोयीसुविधा, अभ्यासपुरक वातावरण, परीक्षेची तयारी व वेळोवेळी सराव परीक्षा यामुळे आपण हे यश प्राप्त करू शकलो, अशे मत यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. य शाळेतील सर्व शिक्षक आशा काळे, उषा उबाळे, कांचन शिरसाट, माया खोडके, सुरेश सुरत्ने, प्रशांत काळे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या परिश्रमाने हे यश मिळाले आहे.
0 टिप्पण्या