Ticker

6/recent/ticker-posts

जलालाबाद येथील भ्रष्टाचाराची चौकशी

जलालाबाद येथील भ्रष्टाचाराची चौकशी


ग्रामपंचायत जलालाबाद सन 2014 ते 2021 भ्रष्टाचार प्रकरणात श्री अजय रामेश्वर नावकार ( बार्शीटाकळी तालुका सरचिटणीस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) यांनी ग्रामविकास मंत्री यांना उच्च स्तरीय समितीची मागणी केल्या नन्तर ग्रामविकास मंत्री साहेबांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला यांना अर्जदाराच्या मागणी नुसार योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यावर पाच महिन्या नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री बारगिरे ( सहा.ग. वि.अधिकारी,पं.स. अकोला ) यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली होती, या समितीने दि.13/06/2022 रोजी सकाळी 10 ला चौकशी ठेवली होती. परंतु या समितिने ग्रामपंचायत जलालाबादच्या रेकॉर्ड मधील एकही रजिस्टर ला हात लावला नाही व जमीनपातळी वर झालेल्या कुठल्याही कामाची पाहणी केली नाही. उलट अर्जदारावर तक्रार दाखल केली म्हणून दबाव टाकण्यात आला.


 कुठलेही पुरावे नाहीत हे रेकॉर्ड नं तपासता कामाची पाहणी न करता समितीने स्वतःच ठरवून टाकले. सकाळी 11 ते 2 पर्यंत समितिने नुसता टाइम पास केल्याची व्हीडिओ क्लिप असल्यामुळे समीतिने कुठलीही कार्यवाही केली नाही असं सिद्ध होते. ग्रामविकास मंत्र्यांचा आदेश आल्या नंतर ही आत्ता पर्यंत दोन्ही समित्यांनी कुठल्या प्रकारची चौकशी केलेली नाही. ह्या समित्या कुठल्या अमिषाला बळी पडल्या का..?? किव्हा समित्यांवर कुठला राजकीय दबाव आहे का..? असा प्रश्न अजय नावकार यांनी उपस्तित केला आहे. समित्यांच्या अश्या वागणुकीमुळे स. ग्रामविकास मंत्र्यांच्या आदेशाचा अपमान केला आहे, ग्रामपंचायत चे रेकॉर्ड व जमीन पातळी वर झालेल्या कामाची पाहणी केली असती तर सगळा भ्रष्टाचार बाहेर आला असता, परंतु दोन्ही समित्यांनी तसे केले नाही.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या