Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस का हाथ, भ्रष्ट परिवार के साथ’! राहुल गांधीच्या बचावासाठी आंदोलन म्हणजे काँग्रेसच्या विसर्जनाचा महोत्सव

काँग्रेस का हाथ, भ्रष्ट परिवार के साथ’!
राहुल गांधीच्या बचावासाठी आंदोलन म्हणजे काँग्रेसच्या विसर्जनाचा महोत्सव



भाजपचे आमदार सावरकर , अग्रवाल यांचा हल्लाबोल


अकोला,देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणाऱ्या गांधी परिवाराच्या बचावासाठी रस्त्यावर उतरून यंत्रणांवर दबाव आणणारे काँग्रेस कार्यकर्ते हे गांधी परिवाराचे गुलाम असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे अकोला जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, अकोला महानगर जिल्हाध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले आहे. भ्रष्टाचारास पाठीशी घालणाऱ्या या आंदोलनामुळे काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आला असून भ्रष्टाचार आणि असत्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास सत्याग्रहाचा मुलामा चढवून काँग्रेसने महात्मा गांधींच्या मूल्यांना मूठमाती दिली आहे, असा आरोपही आमदार सावरकर, अग्रवाल केला.
पाच हजार देशभक्त स्वातंत्र्यसैनिकांनी जमा केलेल्या पैशातून स्थापन करण्यात आलेल्या ‘असोसिएटेड जर्नल’द्वारे चालविल्या जाणाऱ्या ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राकरिता देशात विविध ठिकाणी मिळालेली सुमारे दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करण्यासाठी गांधी परिवाराने यंग इंडियन्स नावाची कंपनी स्थापन करून केवळ ५० लाखांत ही राष्ट्रीय संपत्ती हडप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुनावणीकरिता राहुल गांधी यांना ‘ईडी’ने पाचारण करताच गांधी परिवाराचे भ्रष्ट रूप जाहीर होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या मरगळलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन यंत्रणांवर दबाव आणण्याकरिता सत्याग्रह आंदोलन सुरू करून जनतेस वेठीस धरण्याचा उद्योग चालविला आहे. भ्रष्टाचारी गांधी परिवाराची मर्जी सांभाळण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून यासाठी देशाला वेठीस धरण्याचा काँग्रेचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय अग्रवाल यांनी प्रसिद्धीसाठी जारी केलेल्या एका निवेदनाद्वारे दिला आहे. राष्ट्रीय भावनेतून स्वातंत्र्ययोद्ध्यांनी आपल्या घामाचा पैसा ओतून उभारलेल्या नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचा गळा घोटून गांधी परिवाराने या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता कवडीमोलाने घशात घातल्याच्या आरोपावरून न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.


 या प्रकरणी जामीनावर मोकळे असलेल्यांनी आपल्या बचावासाठी पक्षाला वेठीस धरून आंदोलन करण्याचा आदेश देत दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला असला, तरी सत्य जनतेसमोर आल्याने आता भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असेही आमदार सावरकर विजय अग्रवाल म्हणाले.
राष्ट्रीय कार्यासाठी उभारण्यात आलेल्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड या कंपनीचे रियल इस्टेटच्या धंद्यात परिवर्तन करण्याचा गांधी परिवाराच्या भ्रष्ट कमाईचा डाव उघड झाला असून त्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे या प्रकरणातून वेशीवर टांगली गेली आहेत. केवळ गांधी परिवारासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणाऱ्या काँग्रेसजनांना असत्य आणि भ्रष्टाचाराची पाठराखण करण्यातच अधिक रस असल्याचे स्पष्ट झाले असून काँग्रेसने स्वतःच आपल्या विसर्जनाचा उत्सव सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी खरमरीत टीकाही आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल यांनी केली. गांधी परिवारापुढे गुडघे टेकून देशाला वेठीस धरणाऱ्या ‘काँग्रेसका हाथ भ्रष्ट परिवार के साथ’ आहे, हे या निमित्ताने उघड झाले आहे, असे आमदार सावरकर अग्रवाल म्हणाले.



राजेश पावडे यांच्या भाजप मध्ये जाहीर प्रवेश


अकोला-देशाच्या विकासात अग्रणी कार्य करणारे देशाचे लाकडे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेन्द्रजी फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,मा.केंद्रीय मंत्री खा.संजयभाऊ धोत्रे जिल्हाध्यक्ष व आमदार रणधीरभाऊ सावरकर महानगर अध्यक्ष विजयजी अग्रवाल, जयंतराव मसने, राजेश बेले, किशोर मांगटे, माधव मानकर, संजय गोडा, संजय गोटफोडे व भाजपच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अकोला येथील स्थानिक गुढधी परिसरातील रहिवासी सामाजिक कामात अग्रेसर असे नाव राजेश पावडे यांनी आज कार्यकर्त्यांसमवेत भाजप मध्ये आज जाहीर प्रवेश केला.


येणाऱ्या काळात पक्षाच्या संघटनात्मक वाढी करता काम करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर व महानगर अध्यक्ष विजयजी अग्रवाल यांनी कार्यकर्त्यांना केले आज भाजप कार्यालय अकोला येथे आयोजित कार्यक्रमात पूर्व मंडळ सरचिटणीस संदीप गावंडे, नगरसेवक मिलिंद राऊत,सौ पल्लवी मोरे, , सौ अनुराधा नावकार ,अनिल नावकार,संदीप शेगोकार, मंडळ अध्यक्ष देवाशिष काकड यांच्या प्रमुख मार्गदर्शनात राजेश पावडे यांनी कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये जाहीर प्रवेश करत पक्ष वाढी साठी कार्य करण्याचा शब्द यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिला राजेश पावडे सह यावेळी आशिष कीर्तक,रुपराव पाटील,प्रवीण बलोदे,सुधीर गावंडे,नाजुकराव इंगोले,महादेव पावडे,विजय पावडे,सौरभ वाकोडे,अमोल इंगोले,नामदेव धोटे,राजू धोटे,अमित पावडे,अनिकेत ताथोड,संकेत पावडे,प्रसाद पावडे,दीपक पावडे,गोलू पावडे,आशिष धोटे,प्रमोद नवरखेडे,दत्ताभाऊ कदम,विजय मदनकार,दुर्गेश धोटे,आदित्य जरेकर,भूषण गिरी,तिलक पाटील,कार्तिक शिरसाट,यश भगत,चक्रधर पावडे,विद्याधर काकड,संजय गावंडे,राजु पाटील बेले आदी 



कार्यकर्त्यांनी प्रवेश केला विकास तिर्थ बाईक रॅली

भाजपा युवा मोर्चा आकोट ग्रामीण व शहर तर्फे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्र सरकारची यशस्वी 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल. आज दिनांक 14/06/2022 रोजी भव्य "विकास तीर्थ बाईक रॅली" चे आयोजन करण्यात आले होते. सदर रथ यात्रा व बाईक रॅली नर्सिंग मंदिर आकोट येथुन निघाली सदर रथ यात्रेचे भाजप शहर अध्यक्ष कनक जी कोटक यांनी व युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अकोला श्री सचिन देशमुख यांनी पूजन केले तसेच हिरवी झेंडी दाखवून यात्रेला सुरुवात करण्यात आली.सदर यात्रा आकोट शहरातील नर्सिंग मंदिर व तेथून सोनू चौक नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिवरखेड रोड ला समारोप करण्यात आले. सदर यात्रेमध्ये माननीय भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख,भाजप शहर अध्यक्ष कनक कोटक ,आकोला जिल्हा बूथ चे राजू भाऊ नागमते, राजू भाऊ रावनकार अनिलजी तिवारी भाजयूमो सरचिटणीस किरण अवताडे, भाजयूमो उपाध्यक्ष रोहित भाऊ अव्वालवार,निलेश भाऊ नवघरे, सरचिटनीस अनिरुद्ध देशपांडे, भाजयुमो शहराध्यक्ष राजेश चंदन, भाजयुमो उपाध्यक्ष सुहास वाघ,शंतनु चरपे भाजयुमो सरचिटणीस शहर अक्षय भगत, उमेश हरसूळकर,योगेशजी गोतमारे भाजयूमो सरचिटणीस ग्रामीण गजानन अकोटकर, रवी भाऊ ठाकुर, राधेश्याम ताडे,चेतन राठोड, सागर बोरोडे,सागर तायडे,रोशन मलानी,दीपक नेमाडे, कैलास माकोडे, ऋषी बेराड मयूर नाठे अमोल तायडे विशाल गासे,संजय तायडे,निलेश धुरदेव शिवा बोरकर यांची तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
 


पक्षाचा कार्यविस्तार जनतेच्या शेवटच्या घटका पर्यंत पोहोचवा-आ.रणधीर सावरकर

अकोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव प्राप्त करून देण्याचं काम करून सबका साथ सबका विकास सबका प्रयासाने देश प्रगतीपथावर निवड देशाच्या भौगोलिक सामाजिक आर्थिक विकासातील महत्त्वाचा योगदान देऊन देशाच्या स्वतंत्र संग्रामाच्या महोत्सवानिमित्त देशासाठी प्राणत्याग करणाऱ्यांचा आदरनिर्माण करण्याचं काम कधीपासून दुसरीकडे स्वातंत्र्यसंग्रामात यांच्या 5000 परिवारांची संपत्ती हडपण्याचा काम काँग्रेस करीत असल्याचा असून अशा तत्त्वांपासून सावध गरज असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले . 


-मोदी सरकार ला 08 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध सामाजिक उपक्रम आणि जनतेशी संवाद साधण्याचे कार्यक्रम भाजप संपूर्ण देशात राज्यात आणि जिल्ह्यात राबवते आहे भाजपा लोकप्रतिनिधी यांनी केलेले काम जनतेच्या हिताच्या गोष्टी समाजाच्या शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवण्या करता सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रभावी कार्य करत बूथ स्तरापर्यंत रचना लावण्या करता आगामी काळात कार्य करण्या बाबत आज भाजप अकोला कार्यालयात सोशल मीडिया सेल च्या बैठकीत मार्गदर्शन करताना आ.सावरकरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी विजय अग्रवाल हे होते


  प्रमुख अतिथी म्हणून,महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे,प्रदेश सह संयोजक सागर फुंडकर,पूर्व विदर्भ संयोजक लकीसिंह चावला,स्वानंद कोंडोलीकर,मयूर आसरकार उपस्थित होते बूथ रचने द्वारे केंद्र सरकारच्या 8 वर्ष्याच्या काळातील कार्य आणि मागील पंचवार्षिक मधील राज्य सरकारच्या कार्यकाळातील योजनांची माहिती जनते पर्यंत पोहोचवण्या करता बूथ स्तरापर्यंतची रचना लावण्याबाबत प्रकाश गाडे यांनी मार्गदर्शन केले तर सागर फुंडकर यांनी सोशल मीडियाचे महत्त्व सध्याची परिस्थिती राजकीय तसाच तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. लकी सिंग यांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा व सावधगिरी कशी , डाव पेच, विरोधकांचा कडून होणारा अपप्रचार याबद्दल टिप्स दिल्या. विजय अग्रवाल यांनी सोशल मीडिया सध्या प्रभावी साधन असून कोणती घटना पोहोचण्याचे साधन असून याचा वापर पक्षाच्या सकारात्मक बातम्या साठीकरावेअसे आवाहन केले

यावेळी भाजप अकोला जिल्हा संघटन सरचिटणीस माधव मानकर,महानगर सरचिटणीस संजयजी गोटफोडे,देवाशिष काकड,सोशल मीडिया ग्रामीण जिल्हा संयोजक मोहन पारधी,महानगर संयोजक अक्षय जोशी,सह संयोजक किशोर कुचके,शिवा हिंगणे,सारंग देव,मंडळ संयोजक शिवम ठाकूर,ऋषिकेश पोकळे,अक्षय सूर्यवंशी,वैभव भुईभार,सुनील बाठे,सतीश येवले,हृषीकेश अंजनकर,सुनील आपटे,वैभव पाटील,विलास सावळे,सागर बोराडे,सचिन बायस,राधाकृष्ण दांदळे,प्रमोद गोगटे,राघव टोले,जय लोकवानी,प्रमोद टेकाडे,योगेश गोमासे,संकेत शर्मा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. संचलन अक्षय जोशी तर प्रास्ताविक माधव मानकर तर आभार प्रदर्शन मोहन पारधी यांनी केले



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या