Ticker

6/recent/ticker-posts

जादूटोणा विरोधी कायदा उजळणी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

जादूटोणा विरोधी कायदा उजळणी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न 


महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC) तर्फे *जादूटोणा विरोधी कायदा उजळणी प्रशिक्षण कार्यशाळा* दिनांक 18 व 19 जून 2022 ला एस.एम. जोशी सभागृह पुणे येथे संपन्न झाली. 
  या कार्यशाळेच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून *मा. रविंद्र कदम पाटील* (उपायुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे) यांनी उपस्थिती दर्शवून कार्यशाळेला मार्गदर्शन केले. याशिवाय दुसर्‍या दिवशी ऑनलाइन स्वरुपात *मा. सुमंत भांगे* ( सचिव – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य) यांनी ही कार्यशाळेला उपस्थिती दर्शवून कार्यशाळेला मोलाचे मार्गदर्शन केले. 


  या दोन दिवशीय कार्यशाळेला *मा.श्याम मानव* (सहअध्यक्ष - जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती – PIMC) यांनी मार्गदर्शन केले. या *कार्यशाळेला वर्धा जिल्ह्यातून अ.भा.अंनिस चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय इंगळे – तिगावकर, अ.भा.अंनिस युवा शाखेचे राज्य संघटक पंकज वंजारे, जिल्हाध्यक्ष हरिष इथापे, जिल्हा सचिव निलेश गुल्हाने, जिल्हा महिला शाखा संघटक डाॅ. सुचिता ठाकरे, जिल्हा युवा शाखा संघटक सुमित उगेमुगे उपस्थित होते.*


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या