आ.हरीशभाऊ पिंपळे जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करून पुण्यतिथी साजरी ...
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज दिनांक 23 जून गुरुवार रोजी अभिवादनाचा कार्यक्रम माननीय आमदार हरीश भाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांचे जनसंपर्क कार्यालय लक्कडगंज मुर्तीजापुर येथे उस्ताहर्षपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला.
माननीय आमदार यांनीडॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस हारार्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन केले. त्यांच्यासह सर्व भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीसुद्धा हारार्पण करून अभिवादन केले गेले त्यानंतर माननीय हरिभाऊ पिंपळे यांनी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवन वृत्तांतावर प्रकाश टाकीत सांगितले की डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली.सर्वप्रथम जम्मू काश्मीर भारताचा पूर्ण अभिन्न अंग असून या राज्याचा वेगळा झेंडा व वेगळे संविधान व जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीला पंतप्रधान समजल्या जायचे या साठीच संसदमध्ये डॉ.मुखर्जी यांनी धारा 370 समाप्त करण्याची जोरदार शिफारस केली होती.त्यानंतर 1952 मध्ये जम्मू कश्मीर च्या विशाल रॅली मध्ये आपला हा संकल्प व्यक्त करून जम्मू-काश्मीरला भारतीय संविधानात शामिल करून देईल नाहीतर आपले जीवन बलिदान करून देईल.अशाप्रकारे तत्कालीन पंडित जवाहरलाल नेहरू सरकारला चुनौती देऊन आपल्या दृढ निश्चयावर अटल राहुन आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी 1953 मध्ये बिना परमिशन जम्मू-काश्मीरची यात्रा करण्यास निघाले तेथे पोहोचताच त्यांना गिरफ्तार करून नजरबंध करण्यात आले 23 जून 1953 रोजी रहस्यमय परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला.अशाप्रकारे राष्ट्रीय ऐक्यासाठी प्राणाची आहुती देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना बलिदान दिनी कोटी कोटी नमन करतो.
यावेळेस सर्व भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा पदाधिकारी,कार्यकर्त्यां सह माननीय आमदार हरिभाऊ पिंपळे, विनायक वारे,सचिन देशमुख, कमलाकर गावंडे सह हर्षल साबळे,पप्पू मुळे,राजूभाऊ कांबे, बबलू भेलोंढे, राम जोशी,सचिन खळतरकर, संतोष गोलाईत,अभिजीत डहाळे, चेतन सरदार,लखन मिलांन्दे, गजानन बेलखेडे,अक्षय कापरे, राहुल तिडके,निलेश वानखडे, विनोद मुळे,दिवाकर काटे,गोपाल भारंबे,राहुल गुल्हाने,अमोल प्रजापती, रितेश शिरभाते,अनिल अग्रवाल,विशाल गुप्ता, यांनी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी अभिवादन निमित्त आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.
संतोष माने
अकोला प्रतिनिधी:-
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या