Ticker

6/recent/ticker-posts

मोटर बाईक चोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मोटर बाईक चोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रतीनीधी- संतोष माने
पोलीस स्टेशन खोलापुरी गेट येथे तक्रारदार नामे तिलेश्वर बबनराव फुड़े वय 30 वर्ष रा. अकोली अमरावती यांनी दिनांक 19/5/2022 रोजी पोस्टेला तक्रार दिली की दिनांक 18/5/2022 ते 19/5/2022 चे रात्र दरम्यान त्यांचे गायींचे गोठ्यामसमोर ठेवलेली त्यांची मोटार सायकल हिरो पॅशन प्रो क्र. MH 27 CE 7537 कि. 25000/- रु.ची कोणी तरि अज्ञात चोराने चोरून नेली अश्या फिर्यादीचे जबानि रिपोर्ट वरुन पोस्टे खोलापुरी गेट ला अप.क्र. 141/2022 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.


सदर गुन्हयाचा तपास करित असतांना गुप्त माहीतीचे आधारे सदरचा गुन्हा आरोपी नामे (1) शुभम गणेश बोरकर वय 25 वर्ष रा. महाजपुरा अमरावती (2) कृष्णा दशरथ उगले वय 19 वर्ष रा. कांडलकर प्लाट अमरावती यानी संगणमत करून केलेला आहे अशा माहीती वरून दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेउन विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली वरुन गुन्हयात चोरीस गेलेली मोटार सायकल (1) हिरो पॅशन प्रो कि. 25000/- रु. ची जप्त अटक करण्यात आली व पी. सी. आर. दरम्यान आरोपीतांकडुन पोलीस आयुक्तालय हद्दीतुन ईतर ठिकाणाहुन चोरी केलेल्या मोटार सायकल (2) हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची कि.अं. 20000/-रु.ची (3) एक हिरो स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची कि. अं. 25,000/ रु.ची . (4) हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची कि. अं. 15000/- रु.ची असे एकुन 4 मोटार सायकल एकुन कि. 85,000/- रु.चा मुद्देमाल करुन गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कार्यवाही मा. डॉ. आरती सिंह पोलीस आयुक्त अमरावती शहर श्री. विक्रम साळी सा. पोलीस उपायुक्त परीमंडळ - 2 श्री. भारत गायकवाड स.पो.आ. राजापेठ विभाग यांचे मार्गदर्शनात पोस्टे खोलापुरी गेट चे वरीष्ठ पोलीस निरिक्षक श्री. गजानन तामटे पोहेकॉ अशोक पिंपळकर, पो. हे. कॉ. प्रविण खैरकर, ना.पो. का. सुधीर प्रांजळे, ना.पो.कॉ. मंगेश भेलाये ना.पो.कॉ. नाजिमोद्दीन सय्यद, पो. कॉ. मंगेश हिवराळे, चालक ना. पो. कॉ. संतोष सरोदे पोस्टे खोलापुरी गेट अमरावती शहर यांनी केली.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या