Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी


अकोला राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी हिंदू संस्कृती संवर्धनाचे कार्य करून भक्ती श्रद्धा उत्कृष्ट राजा म्हणून त्यांची कारकीर्द व सर्वांना सोबत घेऊन आपल्या रयतेचे रक्षण करण्याचं काम केल्यामुळे हिंदू समाजात त्यांचे महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगून त्यांचा आदर्श प्रत्येक मातृशक्ती युवाशक्ती ठेवून कार्य करण्याची गरज असल्याचे तसेच भारतीय जनता पक्षाचा शतप्रतिशत विस्ताराचा संकल्प घेऊन प्रत्येक क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचा विचार पोहोचविण्याचे कार्य करणारी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहणारे शेतकरी नेते भाऊसाहेब फुंडकर महाराष्ट्राचे शेतकरी चळवळीतील अग्रणी नेते होते उत्कृष्ट संघटक उत्कृष्ट वक्ता सोबत कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे भाऊसाहेब फुंडकर यांच्या विचार प्रेरणादायी असून त्यांना अभिवादन करणे व त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक राजकीय शैक्षणिक मध्ये अनेक कार्यकर्ते असल्याचे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले स्थानिक भाजप कार्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 257 व्या जयंतीनिमित्त तसेच भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते 


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजरावथोरात होते भाजपा कार्यालयात खासदार संजय धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल च्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पंतप्रधानांची विचार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंगीकार केले भारतीय जनता पक्षाचे सुवर्ण पुरुष आंतरराष्ट्रीय नेते यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना आठ वर्ष पंतप्रधानपदी विराजमान पूर्ण झाल्याबद्दल 30 मे ते 14 जून पर्यंत लोककल्याण विकास पूर्व कार्यक्रम पक्षाच्या वतीने राबविण्यात येत आहे यावेळी तेजराव थोरात यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी माधव मानकर रवी गावंडे माधव मानकर संजय गोडफोडे, श्रीकृष्ण मोरखडे चंदा शर्मा अमोल गोगे निलेशनीनोरे राजेंद्र गिरी विकी ठाकूर संतोष पांडे मंगेश भिवटे, संतोष अग्रवाल अंबादास उमाळे सुमन ताई गावंडे सुनीता ताई अग्रवाल मनोज साहू वैशालीताई शेळके गीतांजलि शेगोकार प्रणिता समरीतकर, भाग्यश्री मापारी सुनिता बागडी संध्या लोकापुरे संगीता नवलकार सारिका देशमुख निकिता देशमुख महेश गोंधळेकर कृष्णा पांडे संतोष अग्रवाल मनीषा भुसारी प्रवीण हगवणे रश्मी अवचार पल्लवी मोरे अनुराधा नवकार मिलिंद राऊत हरीश काळे अभिजीत कडू निलेश काकड हरिभाऊ काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या