गडकरींच्या दौऱ्याला वंचित दाखवणार काळे झेंडे
वंचितची पत्रकार परिषदेत माहिती, अर्धवट कामाचे उद्घाटन अयोग्य
शहरातील दोन्ही उडाणपूलाचे काम नियमानुसार झाले नसून अनेक तक्रारी प्राप्त आहेत. शिवाय कामही अर्धवट झाले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या उड्डाणपुलाचे उद्घाटन करू नये केल्यास त्यांच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवणार असल्याचे मत वंचितचे उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पत्रकार परिषदेत मांडले. शहरातील जेल चौक ते अग्रसेन चौक आणि आळसी प्लॉट ते सिंधी कॅम्प या दोन्ही उड्डाणपुलाचे काम केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार २८ मे २०२२ रोजी पार पडणार आहे.
👂
मात्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नितीन गडकरी यांच्या दौर्याला विरोध करण्यात आला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत प्रा सैर्यवर्धन पुंडकर म्हणाले की, अकोल्याच्या जडणघडण मध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे. असे माजी नगराध्यक्ष विनय कुमार पाराशर यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात यावे अशी मागणी वंचितने किली होती, मात्र विनय कुमार पराशर यांच्या नावाला विरोध केला हे दुर्दव आहे. मात्र शहरातील रसत्याची वाट लागली असताना गडकरांनी अर्धवट उड्डाणपुलाचे काम करणे बरोबर नाही असे मत व्यक्त केले. यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश महासचिव सिरसाट युवक महासचिव राजेंद्र पातोडे, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद दंडवे, महानगरध्यक्ष शंकर इंगळे, वंचितचे नेते हिरासिंग राठोड, गजानन गवई, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे आदी उपस्थित होते.
मनपा प्रशासक असताना भाजपचे प्रदर्शन कसे? असा प्रश्न
जिल्ह्यातील अकोट विधानसमे सोबतच वारी मागांची पुर्णतः बाट लागली आहे. सदर काम गेल्या चार वर्षांपासून संथ गतीने सुरू असून तापर्यंत शेकडो जणांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या रस्त्याची पाहणी करावी तसेच मनपात प्रशासक राज असतांन भाजपने उड्डाणपूलाचा कार्यक्रम कसा आयोजित केला. असा नही पातोडे यांनी उपस्थित केला.
0 टिप्पण्या