Ticker

6/recent/ticker-posts

पशुधन विम्यासाठी वंचित ची विमा कंपनी च्या कार्यालयात धडक

पशुधन विम्यासाठी वंचित ची विमा कंपनी च्या कार्यालयात धडक



पशुधन विम्या संदर्भात जिल्हाभरातुन वंचित बहुजन आघाडी कडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यासंदर्भात आज वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या सह वंचित च्या पदाधिकार्यांनी बजाज अलायंझ् जनरल इन्शुरन्स
कोऑपरेटिव्ह लिमीटेड च्या कार्यालयाला धडक भेट दिली.वंचित च्या पदाधिकार्यांनी विमा कंपनी च्या अधिकार्यांचना धारे वर धरताच पशुधन विमा मध्ये विमा संदर्भात २० अर्जदारांच्या कागदपत्रांची तृटी असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.यात विमा एजंट यांचा हलगर्जीपणा लक्षात आला असता आजच जिल्हा परिषद प्रशासनाकडे पशुधन विम्याचे पैसे पाठवण्यात येतील
आणि दोन दिवसांत विमाधारकांना विमा मिळेल असे अभिवचन मिळाल्यावरच वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकार्यांनी कार्यालय सोडले.


यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट,जि प सदस्य संगिताताई अढाऊ, शोभाताई शेळके, गजानन गवई,संजय हिवराळे, किशोर जामनिक, श्रीकृष्ण देवकुणबी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या