खदान पोलिस स्टेशन कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
दक्षता नगर पोलीस वसाहत परिसरात पोलिस कर्मचारी संजय सोळंके ब. न. 822 यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. आज सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास खदान पोलिस कर्मचाऱ्यांना निंबाच्या झाडाला आपल्या परिसरातील कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलीस वसाहतीमध्ये राहणारा हा कर्मचारी असून खदान पोलिस स्टेशन येथे कार्यरत आहे. सदर कर्मचाऱ्याचे वय अंदाजे 47 वर्ष असून लाल निळ्या चेक्स चे शर्ट परिधान केलेला आहे. संपूर्ण पोलीस वसाहत मध्ये माहिती मिळताच सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट असले तरी सुसाईड नोट मिळाल्याची माही आहे . खदान पोलिस स्टेशन कर्मचारी पंचनामा करून पुढील कारवाई करीत आहेत.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या