Ticker

6/recent/ticker-posts

मातृदिनाप्रमाणेच पत्नीदिन देखील असावा रामदास आठवलेंची इच्छा

मातृदिनाप्रमाणेच पत्नीदिन देखील असावा रामदास आठवलेंची इच्छा

सांगली

नेहमीच विनोदी कवितांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दोन दिवसांपूर्वी केलेली एक मागणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या मागणीवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या राजमती नालगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याला रामदास आठवलेंनी हजेरी लावली होती. यावेळी केलेल्या भाषणात रामदास आठवले यांनी पत्नी दिन असावा ही मागणी केली असून त्यावर चर्चा सुरू झाली आहे. यासोबतच, रामदास आठवले यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी देखील जागवल्या आहेत.


“मदर्स डे तसाच वाईफ डे असावा”


“मदर्स डे आहे, आईचा दिवस आहे. मग जसा आईचा दिवस आहे, तसा वाईफ डे सुद्धा असायला हवा. आपल्या पत्नींचं आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान असतं. तिच आपल्याला घडवण्यात फार मोठं योगदान असतं”, असं रामदास आठवले यावेळी म्हणाले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या