Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद निवडणूक काळात दिलेल्या शब्दाची पूर्तता, वरखेड येथील बहुप्रतीक्षीत मुख्य रस्त्याचे वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी केले भुमिपुजन..

जिल्हा परिषद निवडणूक काळात दिलेल्या शब्दाची पूर्तता, वरखेड येथील बहुप्रतीक्षीत मुख्य रस्त्याचे वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी केले भुमिपुजन..


अकोला - जिल्हा परिषद निवडणूक मध्ये कान्हेरी सरप मतदारसंघात निवडणूक लढविताना वरखेड येथील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचा शब्द वंचितचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला होता.त्या मुख्य मार्गाच्या ३० लाख रुपये किंमतीचे कामाचा शुभारंभ आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि वंचितच्या पदाधिकारी ह्यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.


गेली २५ वर्षे मुख्य रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बार्शीटाकळी तालुक्यातील वरखेड ह्या गावच्या नशिबी मरण यातना होत्या.संपूर्ण गाव हे वंचितचे मतदार असून जिल्हा परिषदेच्या निवडणूक मध्ये वंचितच्या माध्यमातून ही समस्या मार्गी लावून रस्ता पूर्ण करण्याचे अभिवचन राजेंद्र पातोडे ह्यांनी दिले होते.गेली अनेक दिवस पाठपुरावा करीत त्यांनी जिल्हा परिषद माध्यमातून ३० लाख रुपये मंजूर करून दिले.आज तातडीने त्या कामाचा भूमिपूजन सोहळा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे हस्ते आज संध्याकाळी वरखेड येथे पार पडला.ह्यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या पुष्पताई इंगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, दिनकरभाऊ खंडारे, सरपंच सौ पुजाताई निलेश थोप, उपसरपंच लहाणुबाई निखाडे ताई, मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष संजय नाईक, अकोला पं स उपसभापती आनंद डोंगरे,सुरेंद्र तेलगोटे,माजी सभापती अकोला वसंतराव नागे,हीरासिंग राठोड,कीशोर जामनिक, संजय तायडे, प्रमोद इंगळे,अजय पातोडे,ग्रा पं सदस्य नागेश ढोरे, ग्रा पं सदस्य नितेश जाधव,ग्रा पं सदस्य शिलाबाई थोप, सिध्दार्थ निखाडे, शुक्राचार्य निखाडे,सेवकराम निखाडे, प्रमोद निखाडे,जनक निखाडे,राष्ट्रपाल निखाडे, शिवलाल निखाडे, रमेश निखाडे,विशाल निखाडे, राहुल निखाडे,यश निखाडे,अमरदीप निखाडे, अजिंक्य निखाडे, अमरदीप निखाडे प्रामुख्याने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या