अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्य महेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली ड्रायव्हींग लायसन शिबिर
श्रध्देय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या वाढदिवसा निमित्य स्वाभिमान सप्ताहला तार फैल येथे लोकांच्या उत्तम प्रतिसादाने ड्रायव्हींग लायसन शिबिर प्रारंभ
अकोला --/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या वाढदिवसा निमित्य स्वाभिमान सप्ताह साजरा करण्याचे आयोजन केले असुन आज दि. ८/५/२०२२ ते ९/०५/२०२२ ला तार फैल येथे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली ड्रायव्हींग लायसन शिबिराला लोकांच्या उत्तम प्रतिसादाने प्रारंभ झाला आहे.
प्रभाग क्र. 7 मधील नागरीकांनी या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे महानगर अध्यक्ष पुर्व तथा जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगळे, ,वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे , यांच्या नेतृत्वाखाली आज दि 8 व उद्या दि 9 मे असे 2 दिवसांचे ड्रायव्हींग लायसन शिबिर होत असून नागरिकांचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या