Ticker

6/recent/ticker-posts

रेडक्रॉस’ तर्फे आरोग्य यंत्रणांना ऑक्सिमिटर वाटप

रेडक्रॉस’ तर्फे आरोग्य यंत्रणांना ऑक्सिमिटर वाटप



अकोला - रेड क्रॉस सोसायटी राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणाना आधुनिक ऑक्सिमीटर उपलब्ध करुन दिले असून महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व्ही. रंगनाथन यांच्या हस्ते ते जिल्हा आरोग्य अधिकारी व मनपा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. इंडियन रेड क्रॉस सोसायटी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा रेडक्रॉस अध्यक्ष निमा अरोरा,रेडक्रॉसचे डॉ.किशोर मालोकार,जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, अकोला महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.फारुख शेख यांची उपस्थिती होती. तसेच तारा रंगनाथन, सचिव प्रभजितसिंग बछेर, डॉ. एन के माहेश्वरी ,राजाभाऊ देशमुख, ॲड.महेंद्र साहू, ॲड.सुभाष मुंगी ,पवन माहेश्वरी, डॉ. सिमरनजीत सिंह बछेर, हिमोफिलिया सोसायटीचे सचिव परितोष सैय्याम, शर्मिला सैय्याम, एडवोकेट सुभाषसिंह ठाकूर आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.आभार प्रदर्शन मनोज चांडक यांनी केले.


रुग्णवाहिकांचे भाडेदर वाहनाच्या दर्शनी भागात लावावे- उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे



 अकोला- जिल्ह्यात रुग्णवाहिकांचे भाडेदर हे जिल्हा परिवहन प्राधिकरणाने निश्चित केले असून त्यानुसार हे दर रुग्णवाहिकांच्या दर्शनीभागात लोकांच्या नजरेस पडतील असे लावावे, असे आवाहन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

यासंदर्भात श्रीमती दुतोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन आयुक्‍त महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांनी दि. 25 एप्रिल रोजी दिलेल्‍या सुचनेनुसार, रूग्‍णवाहीकेमध्‍ये रूग्‍णवाहीकेचे भाडेदर दर्शनी भागात जनतेच्‍या नजरेस पडतील अशा भागात लावणे आवश्यक आहे. रूग्‍णवाहीकांचे भाडेदर हे जिल्‍हा परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेले आहेत. त्‍यानुसार भाडे आकारावे रूग्‍णवाहीकेच्‍या भाड्यासंबंधी अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्‍त असल्‍याने रूग्‍णवाहीकेमध्‍ये भाडेदर निश्चित दरानुसार दर्शनी भागात लावून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे. भाडेदर रूग्‍णवाहीकेमध्‍ये लावले नसल्‍यास मोटर वाहन कायदयानुसार कार्यवाही करण्‍यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.




अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या