हेल्मेट वापराबाबत जनजागृती रॅली;उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाचा उपक्रम
अकोला - येथील उपप्रादेशीक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस रवाना करण्यात आले. या रॅलीत विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होते.
अपघाती मृत्यू होण्यातुन सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक दुचाकी चालकाने वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेेेने दिली आहे. दुचाकी चालविणाऱ्या प्रत्येकाला न्यायालयाच्या निर्देशानुसार हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य आहे. हेल्मेट वापराबाबत अकोला जिल्हाधिकारी यांनी साांगीतले की हेल्मेट सक्तती नव्हे तर सुरक्षीत प्रवासाच्या दिशेने एक पाऊल टाकत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांची यावेळी उपस्थिती होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोर्णा या मुख्य प्रवेशद्वारापासून सकाळी साडेआठ वाजता ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत उपप्रादेशीक परिवहन कार्यालय तसेच अन्य शासकीय कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघालेल्या या रॅलीतील प्रत्येक दुचाकीस्वार महिला पुरुषाने हेल्मेट परिधान केलेले असल्याने या रॅलीने शहरावासियांचे लक्ष वेधून घेतले. उपप्रादेशीक परिवहन अधिकारी कार्यालय येथे या रॅलीचा समारोप झाला.
0 टिप्पण्या