Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्यावतीने भाजपा स्थापना दिवस निमित्त भव्य आरोग्य शिबिर संपन्न

भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्यावतीने भाजपा स्थापना दिवस निमित्त भव्य आरोग्य शिबिर संपन्न


बूथ प्रमुख हा भाजपाचा आत्मा- आ रणधीर सावरकर


माजी केंद्रीय मंत्री नामदार श्री संजय धोत्रे ,आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल,  युवा नेते अनुप धोत्रे, माधव मानकर, सौ अर्चना मसने , शहर सरचिटणीस संजय गोडा, डॉक्टर विनोद बोर्डे , संजय जिरापुरे, संजय गोटफोडे, अक्षय गंगाखेडकर ,जयंतराव मसने, डॉक्टर किशोर मालोकार, तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, डॉक्टर अविनाश पाटील, डॉक्टर अभय जैन,ऍड सुभाषसिंग ठाकूर,पवन पाडिया, पूर्व मंडळ अध्यक्ष एडवोकेट देवाशीष काकड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्या वतीने भाजपा स्थापना दिवसानिमित्त अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातील बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्या करिता आरोग्य शिबिराचे आयोजन देशमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बिर्ला कॉलनी रोड येथे करण्यात आले होते

याप्रसंगी आमदार श्री रणधीर सावरकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व बूथ प्रमुख हा भारतीय जनता पक्षाचा आत्मा असून पक्षाचे ध्येय धोरणे कार्यान्वित करण्याचे महत्त्वाचे कार्य बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखाच्या माध्यमातून होत असते , त्यांचे पक्षाप्रति समर्पण हे अतुलनिय आहे असे प्रतिपादन केले
आमदार श्री गोवर्धन शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये बूथ प्रमुखाची भूमिका ही केंद्रस्थानी असल्याचे प्रतिपादन केले

महानगराध्यक्ष श्री विजय अग्रवाल यांनी बूथ प्रमुख हा संघटनेतील महत्त्वाचा दुवा असून भाजपाच्या विजयाचे श्रेय हे बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व सर्व कार्यकर्त्यांचे मेहनतीचे फळ आहे असे प्रतिपादन केले

या आरोग्य शिबिरात करिता बाल रोग तज्ञ डॉक्टर श्रीश देशमुख, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सौ झेलम देशमुख ,अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुजित वाघमारे ,नेत्रतज्ञ डॉक्टर सनी मनवानी, दंत तज्ञ डॉक्टर विजय शर्मा ,डायबिटीज स्पेशालिस्ट डॉक्टर सौरभ बोराखडे यांनी सेवा दिली

या प्रसंगी चंदाताई शर्मा, कल्पनाताई भालतीलक, निकिता देशमुख,सागर शेगोकार,निलेश निनोरे, गणेश अंधारे, अमोल गोगे,राजेंद्र गिरी, हरीश काळे, सौ सुनीता ताई अग्रवाल,सौ गीतांजलीताई शेगोकार, सौ पल्लवी मोरे, अनुराधा नावकर,संदीप गावंडे, मिलिंद राऊत, अनिल नावकर, संदीप शेगोकार,मुकेश सरप,  प्रशांत अवचार, सुभाष खंडारे, राहुल देशमुख, सारिका ताई जयस्वाल, आरती घोगलिया, प्रकाश घोगलिया, अजय शर्मा, जान्हवी डोंगरे, संतोष डोंगरे, अनिल मुरूमकार, आशिष पवित्रकार,तुषार भिरड,विशाल इंगळे, शाम विंचनकर, उमेश गुजर, अभिजित बांगर, निलेश काकड, उज्वल बामनेट,आनंद बालोदे, कुणाल शिंदे, केशव पोद्दार, जस्मितसिंग ओबेरॉय, शीतल जैन, मोहन पारधी,अक्षय जोशी,आकाश ठाकरे,अभिजित कडू,अजय पाटील, केशव हेडा,अभिशेक भगत ,रितेश जामनारे, शुभम चंदन, नितील राऊत , यश अग्रवाल, प्रवीण पोटे, मयूर शर्मा, हेमेन्द्र सुनारीवाल,सौरभ धानो

कार, शिवम ठाकूर, यश अग्रवाल, अतुल गोंधळेकर, उमेश श्रीवास्तव,किशोर साबळे,  रवी यादव, घनश्याम भिसे, योगेश फुसे, शंकर कपले,ऋषिकेश नावकर व इतर सर्व पदाधिकारी, नगरसेवक, बूथ प्रमुख शक्तिकेंद्र प्रमुख, व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप गावंडे यांनी केले , सूत्रसंचालन अभिजीत कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन केशव हेडा आकाश ठाकरे यांनी केले

अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या