Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी जिल्ह्यात मद्यविक्री बंद

झरीनाका येथे 24x7 पोलीस व वनविभागाचा संयुक्त चेकनाका ;जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश



 अकोला,  महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 ची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तेल्हारा येथील झरीनाका येथे पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक गठीत करुन 24X7 संयुक्त चेकनाका बुधवार दि.13 पासून कार्यान्वित करावे,असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले. या आदेशात म्हटल्याप्रमाणे, झरीनाका चेकपोस्ट पासून झरी बाजार व दिवाण झरी, उमरशेवडी, चिचणी गाव व तलाई अंबा अपर्वा या परीक्षेत्रात  वनपरिक्षेत्र अधिकारी व पोलीस यांनी दैनंदिन पेट्रोलिंग करावी. या परिक्षेत्रातून  गोवंशाची कत्तल करण्यासाठी गाय, वळू, बैल यांची वाहतूक आणि निर्यात करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


वाढते तापमान- इयत्ता पहिले ते सातवीचे वर्ग सकाळी साडेअकरा पर्यंत -जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश



 अकोला- जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेले तापमान आणि त्याचा विद्यार्थ्यांचा तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता जिल्ह्यातील इयत्ता पहिले ते सातवीच्या सर्व शाळांची वेळ दि.18 पासून सकाळी सात ते साडेअकरा अशी करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले आहेत.
या आदेशात म्हटल्यानुसार, जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, तसेच ग्रामीण भागातील तसेच सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या खाजगी, शासकीय, निमशासकीय शाळांची वेळ दि.18 पासून सकाळी सात ते साडे अकरा अशी करण्यात आली आहे. तापमानाची तीव्रता लक्षात घेता शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाय योजावेत. मनपा आयुक्त, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिनस्त शाळांमध्ये आवश्यक ते नियोजन करावे,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी  जिल्ह्यात मद्यविक्री बंद



 अकोला-  गुरुवार दि.14 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) अन्वये गुरुवारी (दि.14) कायदा सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाची अनुज्ञप्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या