Ticker

6/recent/ticker-posts

शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी शेतकरी पण लखपती व्हावा या उद्देशाने बांधावर वृक्ष लागवड

शेतक-यांच्या उत्पन्नात  वाढ व्हावी शेतकरी पण लखपती व्हावा या उद्देशाने बांधावर वृक्ष लागवड 



आज दि. 7/4/22 रोजी अकोला पंचायत समीती अंतर्गत ग्रामपंचायत धोतर्डी येथे उत्थान फाऊंडेशन व समृध्द गाव योजने अंतर्गत ग्राम पंचायत स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतक-यांच्या उत्पन्नात  वाढ व्हावी शेतकरी पण लखपती व्हावा या उद्देशाने बांधावर वृक्ष लागवड वाढवावी या बाबत आज सरपंच व उपसरपंच  यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील शेतक-यांचे कृषी सहाय्यक व संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीण इंगळे तसेच सचिव श्री. शुक्लोधन वानखडे मार्फत निःशुल्क समुपदेशन करण्यात आले.. यावेळी अनेक शेतक-यांनी बांधावर वृक्ष लागवड करण्यास उत्साहाने सहमती दर्शवली. ग्राम पंचायतीच्या वार्षिक आराखया नुसार रोहयो अंतर्गत बांधावर वृक्ष लागवड करण्याचे नियोजन  करण्यात आले. या नंतर एका शेतकऱ्याच्या शेतात जावुन त्यांनी  बांधावर सागवानची केलेली यशस्वी वृक्ष लागवड सर्वांसोबत पाहण्यात  आली.  यावेळी गावचे सरपंच श्री.रामेश्वर गोहाळे , उपसरपंच श्री.राजेश गायगोळ , श्री.  हितेश जामनीक व कृषी सह्ययक स्नेहा गावंडे मँडम , शेतकरी तथा इतर पदाधिकारी उपस्थित होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या