Ticker

6/recent/ticker-posts

हजारो महिला गंडविणारी सुनिता चव्हाण अकोला पोलिसांच्या जाळ्यात

हजारो महिला गंडविणारी सुनिता चव्हाण अकोला पोलिसांच्या जाळ्यात


 अकोला मधील हजारो महिलांची फसवणूक करणारी सुनिता चव्हाण आज तिला अकोला पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये कार्यकर्ते म्हणुन असणारी सुनिता चव्हाण हिने फॅन्सी बटन बनवण्याची मशीन आणि कच्चा माल देऊन रोजगार देण्याच्या नावाखाली दीड हजार निराधार महिलांची एक कोटी ३२ लाख रुपयांनी रुपयांनी फसवणूक केल्याचे उघडकीस झाले होते. संतप्त महिलांनी अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना घेराव घालून आपली फसवणूक  झाल्याच सांगत होते, फसवणूक करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी महिलांनी केली होती. पूणे येथील राधाकृष्ण सेल्स कार्पाेरेशन महिला स्वयंरोजगार आणि सातारा येथील राधाकृष्ण सेल्स कार्पोरेशनचा मॅनेजिंग डायरेक्टर अजित हिरवे या दोघांविरुद्ध चव्हाण नामक महिलेने तक्रार दाखल केली होती. हा फसवणुक संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांमध्ये झालेली आहे. अकोला नाहीतर बुलढाणा, अमरावती, नागपूर याही जिल्ह्यामध्ये हजारो महिलांना रोजगार देण्याच्या नावावर करोडो रुपयांची फसवणूक केली आहे या महिलेला अकोला पोलिसांना पकडण्या मध्ये यश मिळाले आहे. अकोल्यातील तील या गरीब महिलांच्या 10 ते 15 हजार रुपये प्रत्येकी या मशीन साठी त्यांनी पैसे घेतले होते बटन बनविणारी मशीन तीन फक्त पाचशे रुपये मध्ये उपलब्ध होते परंतु तरीसुद्धा यामध्ये जडू हजार रुपये काढून या महिलेची फसवणूक केली आहे पुणे येथील या कंपनी तिची अकोल्यामध्ये महिला एजंट होती तिला आज अकोला खदान पोलिसांनी खदान पोलिस स्टेशन येथे पोलिसांनी अटक करून,अकोला पोलीस विभाग पुढील कार्यासाठी चौकशी करीत आहे. अशी माहीती सूत्राकडून मिळाली आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या