एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा सुटला????
अकोला आधार क्रमांक एक मध्ये रंगांच्या उदाहरण सहित जल्लोष
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आज न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासादायक निर्णय सुनावीला आहे. यामध्ये 22 एप्रिल पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना रुजू करण्याचे आदेश दिले आहेत, कुठल्याही प्रकारच्या अटी व नियम न लावता त्यांना रुजू करून घेण्याचे आदेश जाहीर केले आहेत. एवढेच नाही तर त्यांना 7 वा वेतन आयोगाचा सर्व मोबदला दिल्या जाईल, संपावलीचा कालावधीमधील मागील दिलेला सेवेचा कार्यकाल सुद्धा गृहीत धरल्या जाईल, त्यावर कोणातही परिणाम होणार नाही, त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सुद्धा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. अशा विविध मागण्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूच्या असून एकूण पाचशे पानाचा हा अहवाल आज न्यायालयात सादर करण्यात आला आणि तो एक मताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे आज अकोला आगार क्रमांक एक मध्ये मागील सात ते आठ महिन्यापासून संपावर असणारे सर्व एसटी कर्मचारी वर्गांनी आनंद उत्सव व जल्लोष रंग-गुलाल उधळून साजरा केला. परंतु जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णयावर कर्मचारी अजुनही ठाम आहेत.
0 टिप्पण्या