बसवाहतूक होत असतांना चौकशी बंद .. ?
कारंजा : राज्य परिवहन महामंडळाच्या दिर्घ कालिन बेमुदत काम बंद आंदोलनानंतर, राज्य परिवहन महामंडळाने खाजगी वाहन-चालक भरती करीत बस वाहतुक सुरु केलेली असून कारंजा बसस्थानकावर वाशिम, अमरावती, यवतमाळ, अकोला करीता बस उपलब्ध होत असल्याने ,काही प्रमाणात का होईना पण प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे . परंतु सदरहु कारंजा बसस्थानकावरील चौकशी कक्षला आणि नियंत्रण कक्षाला कुलूप असल्याने प्रवाशांना बस बाबत कोणतीच चौकशी करता येत नसून माहिती मिळत नाही .
तसेच येथे वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती असताना सुद्धा, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिमच्या निरिक्षण पडताळणी मध्ये,वाहतूक नियंत्रण अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आलेले आहे . तरी विभागीय नियंत्रक आणि स्थानिक आगार प्रमुखांनी, प्रवाशाच्या सोई सुविधेकरीता, कारंजा बस स्थानकावरील नियंत्रण कक्ष आणि चौकशी कक्ष त्वरीत सुरु करण्याची मागणी प्रसार माध्यमाद्वारे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, मोहम्मद मुन्निवाले, विजय पाटील खंडार, उमेश अनासाने आदी पत्रकारांनी संबधीत प्रशासनाला केली आहे .
0 टिप्पण्या