भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या पवित्र दिक्षाभूमिला भेट .
कारंजा : नागपूर येथील प्रत्येक दौऱ्यात इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद असलेल्या आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक असलेल्या पवित्र व मंगलमय अशा दिक्षाभूमिला कारंजा येथील संजय कडोळे हे प्रत्येक वेळी नमन करीत असतात . याबद्दल अधिक वृत्त असे की,पत्रकारांच्या विदर्भस्तरीय अधिवेशनाकरीता नागपूर येथे गेलेल्या,वाशिम जिल्ह्यातील नामवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरिय पत्रकार पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांच्या नेतृत्वात परिषदेच्या पत्रकार आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या कलावंतानी,प्रस्थापित संस्कृती विरुद्ध दंड थोपटून दिक्षा घेऊन इतिहास घडविणाऱ्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांच्या मंगल दिक्षाभूमिला नुकतीच भेट देऊन, पवित्र दिक्षाभूमिला नतमस्तक होत अभिवादन केले . यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेबांनी लावलेला बोधीवृक्ष, संविधान, व डॉ बाबासाहेबांचा संघर्षमय जीवनपट दर्शविणारी चित्रप्रदर्शनीचे इ चा सखोल अभ्यास करण्याचे दृष्टीने निरिक्षण सुद्धा केले . यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर, राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, समाजभूषण पुरस्कारार्थी रामदास मिसाळ, दामोधर जोंधळेकर, विजय पाटील खंडार, युवा समाजसेवी चंद्रकात चव्हाण इ उपस्थित होते
0 टिप्पण्या