जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार तहसीलदारांची विटभट्यांवर कारवाई
शहानवाजपूर, हिंगणा, म्हैसपूर येथील विना परवानगी चालू असलेल्या वीटभट्टी शनिवारी प्रशासनाच्यावतीने शहानवाजपूर, हिंगणा, म्हैसपूर येथील विना परवानगी चालू ही जिल्हाधिकारी निमा अरोरा डॉ. नीलेश अपार र व ए सडीओ यांच्या आदेशानुसा उद्ध्वस्त करण्यात आल्या. मात्र. अपार यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील यांच्या पथकाने केली. गेल्या अनेक दिवसांपासून वीटभट्टी मालक पारसकर व ढोले हे या परिसरात विना परवानगी अवैधरीत्या वीटभट्ट्या काढीत होते. याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, दोन दिवसांत येथील विटा व इतर साहित्य उचलून नेण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली. कारवाई पथकात नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, मंडळ अधिकारी माहोरे, तलाठी सोनवणे, देवीकर, आंबरखाने, निमकांडे, झामरे, राठोड, धवणे आदींचा सहभाग होता. यावेळी ठाणेदार शेळके, पोलीस निरीक्षक महल्ले आदींनी बंदोबस्त चोख ठेवला.
0 टिप्पण्या