Ticker

6/recent/ticker-posts

अकोला शहरात सन उत्सव बघता पोलिसांचे पथसंचालन

अकोला शहरात सन उत्सव बघता पोलिसांचे पथसंचालन


आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरातील पोलिस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज शहरात पथसंचालन केले. कुठल्याही परिस्थितीला पोलिस सामोरे जाण्यास तयार असल्याचे या पथसंचालनातुन दाखविण्यात आले आहे. त्यासोबतच सन उत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. हे पथसंचालन जुने शहरातील भांडपुरा चौक, पोळा चौक, किल्ला चौक, जयहिंद चौक, अलका बॅटरी चौक, अगरवेस, मामा बेकरी चौक, अकोट स्टँड, सुभाष चौक, ताजनापेठ चौक, गांधी चौक, कोतवाली चौक या मार्गावर हे पथसंचालव काढण्यात आले. यावेळी जुने शहर, डाबकी रोड,सिटी कोतवाली, रामदास पेठ, सिव्हिल लाइन पोलिस, खदान पोलिस, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सहभागी झाले होते. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या नेतृत्वामध्ये हा रूटमार्च काढण्यात आला. पोलिस निरीक्षकांसह दुय्यम पोलिस अधिकारी, पोलिस मुख्यालयातील राखीव दल यांचाही पथसंचालनामधे सहभाग होता.


गांधी चौकात पोलिस अधीक्षकांचे केले स्वागत


पथसंचालन गांधी चौकात येताच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पुष्पवर्षाव करण्यात आला. महिलांनी त्यांचे स्वागत करीत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही स्वागत केले.

रामनवमी निमित्ताने वाहतूक मार्गात केला बदल

अकोला शहर उद्या होणाऱ्या रामनवमी करीता सज्ज झाले असून शहरात भव्य दिव्य अशा शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शोभा या दरम्यान नागरिक त्रास होऊ नये म्हणून अकोला वाहतूक विभाग देखील सज्ज झाले असून वाहतुकीच्या मार्गात दिनांक १० एप्रिल रोजी बदल करण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अकोला वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे. रामनवमी निमित्त उद्या रविवार दिनांक १० एप्रिल रोजी शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. श्री राजेश्वर मंदिर येथून श्रीरामनवमी मिरवणुकीला सुरुवात होऊन जयहिंद चौक कोतवाली चौक बियाणी चौक सराफ चौक गांधी चौक कोतवाली चौक येणार असल्याने वाहतूक हि मिरवणूक संपेर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच मिरवणूक मार्गालगतच्या शंभर फूट परिसरात वाहने उभी करण्यास बंदी आहे. सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत हि वाहतूक बंद करण्यात येणार आहे त्यामुळे वाहतूक पोलीस विभागाला वाहनधारक यांनी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे. मिरवणूक संपेपर्यंत वाहनचालकांनी बस स्टॅन्ड येथून डाबकी रोड जाणाऱ्या वाहतुकीत बदल म्हणून बस स्टॅन्ड अशोक वाटिका सरकारी बगीच्या लक्झरी स्टॅन्ड वाशीम बायपास किल्ला चौक भांडपुरा चौक येथून डाबकी रोड या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन अकोला वाहतूक पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या