Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर जयंती व हनुमान जयंती उत्साहात साजरी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर जयंती व हनुमान जयंती उत्साहात साजरी



विश्वरत्न महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती बी. आर सी एफ.अकोला कडून आयोजित -


सुधीर काॅलनी चौक अकोला येथे बि.आर.सी.एफ.कडुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामराव डामरे व श्री मधूकर वानेडकर यांनी फोटो प्रतिमेला हार अर्पण केला. बाबासाहेबांच्या सामाजीक, शैक्षणिक, शेतीसंबंधीत लिखाणावर त्यांच्या त्यासंबधीत केलेल्या राज्य घटनेमधील तरतुदी व इतर अनेक पैलूंचा विचार आपल्या भाषणातुन वक्ते श्रि.रेवस्कर सर, . पिं. के. शेकोकार, पांडुरंग वाडेकर, मधूकर वानेडकर, श्रीराम राखोंडे, गजानन पद्‌भने, राम शेगोकार गुरुजी, रामभाऊ ताजणे, प्रा. धनजय खिराडे या मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विविध पैलूवर त्यांच्या अफाट ज्ञानावर, शक्तीवर  प्रकाश टाकला.कार्यकमाचे संचालन गजानन काकडे यांनी केले.


 कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात समाजबांधव -श्री लक्ष्मणराव पद्‌मणे, निरंजन गव्हाळे, विश्वणु वाडेकर, शेषराव गव्हाळे, महादेव इंगळे, किसन पदमणे, महादेव कळसकर, महादेव गवई, आत्मा राम भटकर, प्रभाकरराव रेवसकर,ईशान चापके, गजानन डोईफोडे,व साहेब राव डोंगरे, गजानन वाडेकर उपस्थित होते.कार्यकमाचे आभार प्रदर्शन श्री किशोर भाऊ राजगुरू यांनी केले.

क्रांतीसुर्या सारखा गुरु, विश्वरत्नासारखा शिष्य, पुन्हा होणे नाही: विवेक खडसे



देशभरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर     यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाशिम मध्येही सामाजिक कार्यात लोकप्रीय असलेल्या राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहु. संस्था, वाशिम द्वारा संचालित भारत व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेज, वाशिम व मूकनायक विचार मंचच्या वतीने हर्षउल्हासात जयंती साजरी करण्यात आली. तब्बल दोन वर्षांनंतर महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास सरकारने परवानगी दिल्यामुळे एक वेगळाच उत्साह सगळीकडे पाहायला मिळला.
महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त राजरत्न संस्थे कडुन ३१३१ लाडू व केळी तर मूकनायक विचारमंच कडुन शितपेय वाटप करण्याचा उपक्रम राबवीला गेला. स्टॉलचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु-शीष्या सारखी उंची भविष्यातही कोणी गाठू शकणार नाही कारण महात्मा ज्योतिबा फुले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल स्वराज्य हव होत. ज्या मधे समता, बंधुता, न्याय, एकात्मता अपेक्षीत होती. त्यांच स्वप्न महानायक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून पूर्ण केले. चाकोरीबद्ध मांडणी करून संविधानाच्या माध्यमातून एकसंध करत न्याय, बंधुता, समानता, एकात्मता याची सांगड घालून जगातील सर्वात चागंले संविधान लिहून आपल्या गुरूला व गुरूच्या गुरूला अपेक्षित असलेलं स्वराज्य  संविधानाच्या रूपाने लिहून ठेवले ज्यामुळे भारतात अनेक जाती, धर्म, पंथ, भाषा असून सुद्धा भारत जगात वेगळेपण जपून आहे. असा गुरु व  गुरुचा शिष्य पुन्हा होणे नाही त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅम बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अनुकरण करत वाटचाल करीत यशस्वी होण्याचा प्रयत्न व महापुरुषांच्या विचारांचा वारसा जोपासण्याची धुरा प्रत्येकाने खांद्यावर उचलली पाहिजे असे मत उद्घाटन प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी व्यक्त केले. प्रमुख उपस्थिती मध्ये राम शृंगारे, तालुका महिला, बाल विकास अधिकारी बी.बी. धनगर यांची उपस्थिती होती. जयंती महोत्सव यशस्वीतेसाठी फायर अॅन्ड सेफ्टीच्या विद्यार्थ्यांनी विषेश मेहनत घेतली यामध्ये पवन चव्हाण, शैलेश चव्हाण, श्री चव्हाण, धिरज इंगोले, अक्षय जाधव, राज जाधव, मेघा इंगळे यांचा समावेश होता. जयंती महोत्सवाचे आयोजन राजीव दारोकार, विकास पट्टेबहादूर, वैशाली खोब्रागडे-मेश्राम, विधी मेश्राम, सागर बदामकर, वेदांत मेश्राम, पी.एस. खंडारे, कुसुम सोनोने, निलेश भोजणे, रामकृष्ण कालापाड, अस्विनी इंगोले, महादेव बाभणे, सुनील जाधव, ज्ञानेश्वर अखंड, सचिन जाधव, संतोष गायकवाड, प्रशांत जाधव, गणेश जाधव, विनोद पट्टेबहादुर आदींनी
 प्रयत्न केले.



महामानवास  तूफान आतिशबाजी करुन दिली सलामी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले  व  महामानव, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहु. संस्था,वाशिम व्दारा संचालीत भारत व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेज, वाशिम मूकनायक विचारमंचे    वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,वाशिम तुफान आतिशबाजी करुण महामानवास सलामी देण्यात आली. तुफान आतिशबाजीने परीसर दनानुन गेल्याने भीमअनुयाया मध्ये नवचैतन्य संचारले होते. तब्बल दोन वर्षानंतर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असल्याने मोठ्या प्रमाणात उल्हासात संस्थेकडून जयंती  महाउत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त ३१३१ लाडू, केळी व विचार मंचाकडून शीतपेय वाटप करण्यात आले.


राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहु. संस्था, वाशिम द्वारा  संचालित भारत व्होकेशन ट्रेनिंग कॉलेज, वाशिम व मूकनायक विचार मंचच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वाशीम येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दिवसभर राबवीलेल्या गेलेल्या उपक्रमाने परिसरात झालेली अस्वच्छता स्वच्छता अभियान राबवून दूर करण्यात आली व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा
  

कारंजा 
      भगवान 1008 महावीर जयंतीचे  औचित्य साधून दिवसभर जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी देवेंद्र कीर्ती सभागृह या ठिकाणाहून शहराच्या प्रमुख मार्गाने भगवान महावीर यांचा संदेश देत भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली. 
         शोभा यात्रेमध्ये घोड्यांचा सहभाग, लेझीम,  बँडपथक, भजनीमंडळे, आदिचा सहभाग होता.  तसेच भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान असलेला रथातून शोभा यात्रा मार्गक्रमण करीत असताना युवक युवती व लहान बालके तसेच भगवान महावीर यांच्या वाणीचा प्रचार करीत होते. जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शोभा यात्रेदरम्यान देवडा व गोलेच्छा परिवाराकडून तसेच सतांबर जैन मंदिराकडून थंड सरबत व पाण्याचे वाटप करण्यात आले. या शोभायात्रेत अश्वावर गंधक व चाणेकर कुटुंबातील सदस्य वेशभूषा घालून स्वार झाले होते. त्यामुळे या शोभायात्रेला अधिकच महत्त्व आलं
शोभा यात्रेदरम्यान नेविपुरा परिसरात  या भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन घरोघरी जैन बांधवांकडून करण्यात आले. या शोभायात्रेत युवक व मुलींनी डान्स करून शोभा यात्रेची अधिक शोभा वाढवली . या शोभायात्रेत सकल जैन समाजातील पुरुष महिला युवक-युवती व लहान बालकांचा जैन धर्मातील पताका व झेंडे घेऊन हिरिरीने सहभाग होता. भगवान महावीर यांचा जयघोष शुद्ध शाकाहारीचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून शहरवासीयांना देण्यात आला. या रॅलीत ठाणेदार आधारसिंह सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता शासनाच्या नियमाला अनुसरून ही जैन धर्माची शोभा यात्रा  पार पडली. यानंतर शोभा यात्रा मंदिरात पोचल्या नंतर  १००८ श्री भगवान महावीर  जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सतीश भेलांडे,प्रमुख व्याख्यात्या बा. ब्र. सविता दीदी भोपाल व भारती दीदी , समाजातील प्रमुख पाहुणे जेष्ठ समाजबांधव  अरुण कुमारजी नांदगांवकर , धन्यकुमारजी मांडवगडे ,  वसंतकुमारजी वैद्य, अतुलजी काळे ,  शैलेश चढ़ार एड संदेश जिंतुरकर यांची उपस्थिती होते. समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. 


प्रमुख व्याख्यात्या बा. ब्र. सविता दीदी यांचा परिचय वृंदाताई चवरे यांनी करुन दिला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन दर्यापूरकर व विवेक गहाणकरी तर आभारप्रदर्शन पवन उखळकर यांनी केले. असे वृत्त प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसारमाध्यमाला कळविले आहे .

सामाजिक समता कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच महिला आज पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत
                        

वाशिम,दि. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल व्याख्यान,तृतीयपंथी व्यक्तीमध्ये जनजागृती व ओळखपत्र वाटपाचे आयोजन आज १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.
        कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती किरण गि-हे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. श्रीमती दिपाली सांबर, डॉ. पी.एन.संधानी,श्रीमती पेंढारकर, तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ उपस्थित होते.
      श्रीमती गि-हे पुढे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग, संघर्ष महिलांनी लक्षात ठेवला पाहिजे. कारण त्यांनी महिलांसाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. त्यामुळेच आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या. 
      अॅड. श्रीमती सांबर म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांसाठी खूप मोठे कार्य केले. तुम्ही स्व:तासाठी न जगता इतरासाठी जगा.भारतीय परंपरेमध्ये जे महिलांचे शोषण व्हायचे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बंद केले. सर्व महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिला,शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
        डॉ.संधानी यांनी तृतीयपंथीबद्दल समाजामध्ये आजही तिरस्काराची भावना आहे.आजही समाज त्यांचेवर टीका टिप्पणी करतो. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासने सन २०१३ च्या ध्येय - धोरणामध्ये तरतुदी केलेल्या आहेत,असे ते म्हणाले.
          तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे म्हणाल्या, ग्रामीण भागामध्ये आजही तृतीयपंथी शब्द माहित नाही.आजही समाजामधील जीवन जगण्याची कार्य पद्धती बदलण्याची आवश्यकता आहे. तृतीयपंथीयांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष आहे.असे त्यांनी मनोगतामध्ये सांगितले.
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल चोंडकर,विजय भगत,गोविंद उगले, श्रीमती आर.एन.साठे, एस.एम.निमन तसेच समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी, ब्रिक्स इंडिया प्रा.लि.चे जिल्हा व्यवस्थापक अनिल गायकवाड यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण निरीक्षक ए.बी.चव्हाण यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर कव्हर यांनी तर आभार संध्या राठोड यांनी मानले. असे वृत्त प्रसार माध्यमाला संजय कडोळे यांनी कळविले.


कारंजातील श्रीहनुमान जन्मोत्सव                             
कारंजा : उद्या चैत्र शुद्ध पोर्णिमा, शनिवार दि .१७ एप्रिल रोजी, कारंजा शहरातील शेकडो . श्री हनुमान मंदिरमध्ये , मोठया आनंदोत्साहात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केल्या जाणार असून अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे . यानिमित्ताने सर्व मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिरांवर रोषनाई करण्यात आली आहे .प्रातःकाळी सर्वच श्रीहनुमान मंदिरावर अभिषेक, श्री हनुमान चालीसा व महाआरती होईल त्यानंतर ठिक ठिकाणी महाप्रसाद होणार आहे . श्री जुळवा हनुमान, वाल्हई फाटा कारंजा व कारंजातील सर्वात प्राचिन संकटमोचन श्री हनुमान मंदिर भिलखेडा, श्री खोलेश्वर हनुमान मंदिर, शिवायन नमः मठ संस्थान येथे श्रींची यात्रा भरणार आहे . तसेच शहरातील शिवाजी पुतळा, टिळक चौक, शिवाजी नगर, बजरंगपेठ, माळीपूरा, महाराणा प्रताप नगर , रामासावजी चौक, जिजामाता चौक इत्यादी शेकडो मंदिरावर महाप्रसाद भजन किर्तन कार्यक्रम होणार असल्याचे जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ दिंडी प्रमुख संजय कडोळे यांनी कळविले आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कामगार सेल वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बेघर निवारा केक  कापून साजरा
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हरिदास भदे साहेब,सुमीरमा फाउंडेशन अध्यक्षा डॉ पुजा सुमीत्रा रमाकांत खेतान ,भानूदास कांबळे ,पहेलवान सुनील शिरसाट, मिलिंद गवई, बाबुराव खरात आशिष खिल्लारे या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन धर्मेंद्र शिरसाट जिल्हाध्यक्ष कामगार सेल यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूराव खरात आभार प्रदर्शन धर्मेंद्र शिरसाट यांनी केले प्रमोद गवई ,मिलिंद जाधव ,संजय ठोके ,सोनू ठाकुर, प्रमोद मोरे, प्रशांत जाधव, विक्की मोरे, पवन मोरे  कामगार सेल सर्व कार्यकर्ते उपस्थित होते



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या