लावरे ती आग... बार्शिटाकळी(धाबा) राखीव वन परिक्षेत्रात आग लागली की लावली गेली ?
प्रतीनीधी-
शेख मोहम्मद, अकोला
मुळात जळालेली लागवड झाली होती की नाही?
हा यक्ष प्रश्न निर्माणझाला आहे. शासनाला सादर केलेल्या दि. 31 मार्च 2022 अखेरीस आँनलाईन रिपोर्ट नुसार बार्शिटाकळी प्रादेशिक वन परिक्षेत्रातातील पिंजर रोपवनात FFDT-33Cr.-39215-20 हेक्टर-20000 व्रुक्षलागवडी पैकी जिवंत वृक्ष-12675 -63,38 टक्केवारी ,FFDT-33Cr-39216-20हेक्टर--20000 पैकी जिवंत वृक्ष -12675 -63,38 टक्केवारी एकुण टोटल जिवंत वृक्ष, 25350. लोहगड रोपवनातमध्ये 81080- 25हेक्टर-39750 पैकी जिवंत वृक्ष -19429 टक्केवारी-48,88, याप्रमाणे बार्शीटाकळी तालुक्यामध्ये या राखीव वनामध्य जवळपास 80 हजार वृक्ष लागवड केल्याचे दाखवून सलग 3 वर्षे व्रुक्षलागवड, संगोपन, संवर्धन खर्च म्हणून लाखो रुपयांची निधी खर्ची दाखविल्या गेली व योजनाच्या पुर्णत्वानंतर नेमक्या त्याच जंगलामध्ये आग लागून संपूर्ण लागवडच नष्ट करुन, होते नव्हते पुरावे संपविण्याचे प्रयत्न असतांना ही व्रुक्षलागवड पुर्णपणे बनावट असून फक्त कागदावर करण्यात आली होती हे सिद्ध होते. शासनाने या बाबींची गंभीर दखल घेऊन 80 हजार व्रुक्षलागवड योजनावर झालेला खर्च दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वसूल करुन शासनास फसविण्या साठी गुन्हे दाखल करावे.
शासकीय प्रघाता नुसार कोणत्याही योजनेच्या कामासाठी पूर्व सुचना देऊन कष्टकरी मजुर जमा करण्यात येऊन त्यांच्या कडून ईस्टीमेट नुसार शासकीय दर मजुरीने कामे करवून कामाचे प्रत्यक्ष मुल्यमापन करुन मोजमाप पुस्तकेत (M.B.) नोंद घेण्यात येते. नंतर बीले प्रमाणीत करुन पेमेंट केल्या जाते परंतु या रोपवनात 31मार्च 2022 च्या आधीच कामे न करता आलेल्या निधीतून बीले मंजुर करण्यात आली.स्थानिक मजुरांना कामे न देता मध्यप्रदेशातील कोरकू मजुरांना कमी दराने मजुरी देऊन पिंजर रोपवनात आजच टीसीएम नाली खोद काम करण्यात येत आहे. 3 वर्षीय कालावधीच्या लागवड, संगोपन,संवर्धन योजना कागदावरच राबवून सरतेशेवटी आग लाऊन नष्ट करुन पुन्हा समांतर चर खणून लिपापोती साठी कारवाई व्हावी.
0 टिप्पण्या