सैयद मोहसीन ऊर्दु हायस्कुल अँन्ड ज्युनीयर कालेज शिवनी भारतरत्न डाॕ बाबा साहेब आबेडर जयंती मोठ्या ऊतसाहत साजरी
यंग मुस्लिम एज्युकेशन अँन्ड सोशल वेलफेअर सोसायटी पातुर द्वारा संचालीत सैयद मोहसीन ऊर्दु हायस्कुल अँन्ड ज्युनीयर कालेज शिवनी मध्ये १४ एप्रील २०२२ रोजी भारतरत्न डाॕ बाबा साहेब आबेडकर १३१ वी जयंती मोठ्या ऊतसाहत साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील मुख्याध्यापक सैयद मोहीब ईकबाल सर होते कार्यक्रमाची प्रसतावना शाळेतील शिक्षक असीमोद्दीन सर यानी केले व डाँ बाबा साहेब यांनी मंत्र दीले की शिका संघटीत राहा आणी संघर्ष करा विधार्त्यांना पटवुन सांगीतले व विधार्त्यांनी वकतृत्व स्पर्धा काव्यवाचन व भारतरतन डाॕ बाबा साहेब आबेंडकर याच्या जीवनातील प्रसंग विधार्थ्यानी प्रसतुत केले वतसेच शाळेचे संस्था सचिव सैयद अकबर अब्दुलाह सर यांनी शाळेची लायब्ररीला व विधार्थ्याना पुस्तके भेट दिली. कार्यक्रमा चे सुत्र संचालन मोह्ममद अनवारोद्दीन सर यानी केले आभार प्रदशन शमशेर खान सर यानी केले केले कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी शाळेतील शिक्षक व शिक्षककेत्तर कर्मचारी ऊपस्थित होते
अकोला:- बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज सकाळी अशोक वाटिका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला बहुजन समाज पार्टीचे प्रभारी डॉक्टर धनंजय ऊर्फ बाबा नालट महेंद्रकुमार आवारे व धर्मेंद्र शिरसाट व बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी हजर होते असे बहुजन समाज पार्टीच्या वतीने कळविण्यात आले आहे
"अहिंसेचे आद्य प्रवर्तक भगवान महावीर आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ." -
कारंजा [लाड] कारंजा पत्रकार मंच कारंजाकडून आज दि.१४ एप्रिल २०२२ रोजी कार्यालयात, भगवान वर्धमान महाविर तथा विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा सी . पी . शेकुवाले हे होते . तर प्रमुख अतिथी मुख्याध्यापक विजय भड गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते विलास डोंगरे तथा कारंजा पत्रकार मंचाचे अध्यक्ष दै हिन्दुस्थान ता . प्रातिनिधी दिलीप पाटील रोकडे हे होते .
सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले .यावेळी प्रा.शेकुवाले यांनी "डॉ .बाबासाहेब यांनी शिक्षणाला वाघीणीचं दूध समजून आपलं संपूर्ण जीवनच शिक्षण मिळविण्यासाठी खर्ची घातलं व प्रखर अभ्यासाअंती प्रजासत्ताक देशाला राज्यघटना देऊन सर्वांना समान आधिकार दिले . त्यामुळे पत्रकारांनी गरजू विद्यार्थ्याना शिक्षणात मदत करावी व पुढील पिढी सुशिक्षित करावी असे सांगीतले . तर "जैन धर्मियांचे चोविसावे तिर्थकर भगवान वर्धमान महाविर आणि मानवतेची / समतेची शिकवन देणारे स्वतंत्र भारताचे भाग्यविधाते विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येणे हा सुवर्णयोग असल्याचे प्रतिपादन करीत त्यांची शिकवण आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे मत आपल्या संभाषणातून कारंजा पत्रकार मंचाचे सल्लागार तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी व्यक्त केले." कार्यक्रमाचे संयोजन विलास राऊत यांनी केले . कार्यक्रमाला चाँद मुन्निवाले विजय पाटील खंडार, डांगुर, अनिकेत भेलांडे, जहिरभाई, किरण क्षार, विजय गागरे, उमेश अनासाने इत्यादी उपस्थित होते .मोहम्मद मुन्निवाले यांनी समारोपिय संभाषण केले.
न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी
न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक माधव मुनशी तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक विज्ञान रेलकर व पर्यवेक्षक दत्तात्रय तारे,अमोल बुटे, जेष्ठ शिक्षक अमित सबनीस सर लाभले.
कार्यक्रमात मिलिंद घोगले, गोपाल सांगूनवेढे सरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करून ज्ञान वृद्धींगत करावे अशी अपेक्षा वजा सुचना विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणातुन मुनशी सरांनी केली. शासन परीपत्रकानुसार चित्रकला स्पर्धा,वाचन उपक्रम, निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात आल्या.
कार्यक्रमाचे बहारदार संचलन रसिका जयस्वाल यांनी तर आभार प्रदर्शन अर्चना रंजनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.
0 टिप्पण्या