Ticker

6/recent/ticker-posts

एकलव्य इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांची प्रवेश परिक्षा 5 जून रोजी

एकलव्य इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांची प्रवेश परिक्षा 5 जून रोजी



अकोला-     आदिवासी विकास  विभागामार्फत एकलव्य निवासी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गात  शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची  दि. 5 जून रोजी स्पर्धा  परिक्षा  घेण्यात येणार  आहे. या परिक्षेसाठी दि. 5 मेपर्यंत  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकामार्फत  विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.



 या परिक्षेसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलढाणा,  वाशिम  या जिल्ह्यातील  सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या शाळा, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये सन 2021-22  या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवी मध्ये शिकत असलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतील.  या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रवेश परिक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडुन भरून घेऊन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचेकडे दि. 5 मेपर्यंत सादर करावे.  या परिक्षेचे अर्ज  शासकीय आश्रम शाळेतील  मुख्याध्यापक व  प्रकल्प अधिकारी कार्यालय  यांच्याकडे विनामुल्य  उपलब्ध आहेत.  ही परीक्षा दि. 5 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी एक यावेळात  शासकीय आश्रमशाळा कोथळी ता. बार्शिटाकळी जि. अकोला व शासकीय आश्रमशाळा घाटबोरी ता. मेहकर जि. बुलडाणा येथे होणार आहे. तरी या परीक्षेस जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रविष्ठ व्हावे, असे आवाहन एकात्मिक  आदिवासी विकास प्रकल्प, अकोलाचे  प्रकल्प  अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी केले आहे.



जवाहन नवोदय विद्यालय; शनिवारी 30 ऐप्रील प्रवेश परिक्षा



अकोला -जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा जिल्ह्यातील 24 केंद्रावर होणार असून एकूण 6351 विद्यार्थी या परिक्षेस उपस्थित राहणार आहे. या परिक्षेकरीता विद्यार्थ्यांनी प्रवेश डाऊनलोड करुन शनिवार दि. 30 एप्रिल रोजी सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत दिलेल्या परिक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी केले आहे.
 परिक्षेकरीता लागणारे प्रवेश पत्र www.cbseitms.nic.in या संकेत स्थळावर लॉगीन करून प्राप्त करावा. यासाठी युजर नेम हे विद्यार्थ्यांला ऑनलाईन अर्ज भरतांना मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड, विद्यार्थ्यांचे जन्म तारीख आवश्यक राहील. प्रवेश पत्र डाऊनलोड केल्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्याकडून स्वाक्षाकिंत  करून प्रवेश पत्र परिक्षा पर्यवेक्षकाकडे जमा करावा लागणार आहे.  हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरलेले असल्यामुळे त्यात कोणताही बदल करण्यात येऊ शकत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय, बाबूळगाव (जहाँ) येथे कार्यालयीन वेळेत किंवा दुरध्वनी क्रमांकावर 07242258981  संपर्क साधावा.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या