मौजे शेळद येथे अनधिकृत वीट भट्टी नष्ट
अकोल्यामध्ये वीट भट्टी बंद ठेवण्याचे आदेश असल्यानंतरही, मौजे शेळद येथे अवैधरित्या वीट भट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी स्वतः रात्रीच्यावेळी जाऊन वीट भट्टी बंद करण्यास भाग पाडले. मागील दोन ते तीन महिन्यापासून विटभट्टी चालू न ठेवण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी यांनी काढले. यामुळे अकोल्यामध्ये प्रदूषण जास्तीत जास्त वाढण्याचे काम करत आहेत, त्यामुळे वीट भट्टी वाल्यांना बारा नियमांचे पालन करीत नवीन नियमावलीप्रमाणे विटभट्टी सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरी अकोला जिल्ह्यामध्ये नियमाचे उल्लंघन करून विटभट्ट्या सुरू असल्याची माहिती उघड होत आहेत.
मौजे शेळद ता.बाळापूर येथे सुरू असलेल्या एका अनधिकृत वीट भट्टीस आज महसुल यंत्रणेने जेसीबी यंत्राद्वारे नष्ट करण्यात आले. यासंदर्भात महसूल सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, बाळापुर तहसील कार्यक्षेत्रातील मौजे शेळद येथील गट क्रमांक 2 मध्ये निरंजन कळस्कार नामक व्यक्ती अवैधरित्या वीटभट्टी व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीकडे वीटभट्टी व्यवसाय करण्याकरिता कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या निर्देशानुसार, जेसीबीद्वारे वीटभट्टी नष्ट करण्यात आली. या कार्यवाही प्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा, तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीमती प्रणिता चापले, तहसिलदार बाळापुर सय्यद शेख, मंडळ अधिकारी पारस दीपक सोळंके, तलाठी सचिन खंडारे या कार्यवाही दरम्यान सुरक्षा व्यवस्थेच्या कामानिमित्त बाळापूर पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांचा बंदोबस्त उपस्थित होता. तसेच जिल्हा प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांचे कर्मचारीही उपस्थित होते.
0 टिप्पण्या