भाट समाजाचे प्रथम राज्यस्तरिय अधिवेशन श्री क्षेत्री शेगावी
प्रथमच महाराष्ट्रातील सर्व भाट समाजाचे अधिवेशन श्री क्षेत्र शेगाव येथे शनिवार दिनांक 23 एप्रिल व रविवार दिनांक 24 एप्रिल 2022
रोजी राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे.यात संपुर्ण महाराष्ट्रातून भाट समाजबांधव येथे पोहचणार आहेत त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पुर्व नागपुर चे आमदार कृष्णा खोपडे राज्यातील अनेक खासदार आणि आमदार यांनी शुभेच्छा संदेश पत्राद्वारे दिलेला असून या अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.भि.रा.इदाते , (अध्यक्ष , विमुक्त व घुमन्तु जनजाती विकास बोर्ड,नवी दिल्ली )उपस्थित राहणार आहेत.सदरकार्यक्रमाच्या निमीत्याने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भाट समाज नागपुरचा वतीने अनेक समाजबांधव पोहचतील.23 एप्रिल च्या पुर्वसंध्येला राज्यभरातुन शेगाव येथे आलेल्या समाजातील महीलांचे परिचय मेळावा व हळदी-कुंकु कार्यक्रमाचे आयोजन केले असुन त्याच वेळी राज्य कार्यकारणी व राज्यातील सर्व जिल्हा संघटन पदाधिकारी यांची संयूक्त बैठकीचे आयोजन केले आहे.
रविवार दिनांक 24 एप्रिल ला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे प्रयत्न पुढील कार्यक्रमाचे नियोजन केले आहेत त्यात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, देवी सरस्वती माता व वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण तसेच वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना व सरस्वती वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल.यात समाज प्रबोधनकार तुषार सुर्यवंशी यांचे समाज प्रबोधनाचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
सदर अधिवेशन श्री लाँन्स व मंगल कार्यालय , आनंदसागर रोड , विसावा भक्तनिवास शेजारी शेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनाचे आयोजक अखिल महाराष्ट्र भाट समाज व संपूर्ण राज्य पदाधिकारी असुन. स्वागत समिती बुलठाणा जिल्हा संघटन आहे. या अधिवेशनात नागपुर तर्फे जास्तीत जास्त संख्येने समाजबांधव यावेत यासाठी नागपुर कार्यकारिणी अध्यक्ष विजय खडतकर,उपाध्यक्ष गजानन जगताप,सचिव सुनील सुर्यवंशी ,सहसचिव सुहास सुर्यवंशी, सौ सीमा चव्हाण,कोषाध्यक्ष गुलाब बाविस्कर,सदस्य ज्ञानेश्वर लाडसे,मोरेश्वर चव्हाण,विनोद दशमुखे, विजय वानखेडे,गजानन लाडकर,राम निचळ, सौ राणी मोरे,सौ शारदा सुर्यवंशी ,युवा व महिला संपुर्ण सहकार्य केले आहे.
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या