Ticker

6/recent/ticker-posts

श्रीधर पर्वात वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा व मी सावित्री एकपात्री प्रयोगाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

श्रीधर पर्वात वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा व मी सावित्री एकपात्री प्रयोगाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा



अकोला दि. ८ मार्च - निंबा परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, ग्रामीण विकास आणि विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कार्याने कर्मयोगी ठरलेल्या स्व. श्रीधराव देशमुख उपाख्य ‘मालक’ यांचा जन्म शताब्दी महोत्सवात नियोजित कार्यक्रमातील महिला दिनानिमित्य निंबा व पंचक्रोशीतील महिला, भगिनीं व विद्यार्थिंनीसाठी वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेचे व तसेच "मी सावित्री" ह्या लोकप्रीय एकपात्री प्रयोगाचे आयोजन निंबा येथील श्री मारोती संस्थान करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा सौ. ज्योतीताई सोनोने,  प्रमुख अतिथी म्हणून उप-सरपंचा सौ. अंजलीताई तायडे, दर्यापूरच्या श्रीमती चंद्रकलाताई रामकृष्ण भारसाकळे, श्रीमती शकुंतलाबाई देशमुख व सौ. सुनंदाताई देशमुख उपस्थित होत्या.


"श्रीधरपर्व" - स्व. श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक जन्म शताब्दी महोत्सव आयोजन समिती द्वारे जन्मशताब्दी वार्षिक कार्यक्रमावतील पूर्व नियोजित वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा व मी सावित्री एकपात्री प्रयोगाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनाचे अवचित्य असल्याने महिलांची विशेष उपस्थिती होती.  वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. पूजा देशमुख, द्वितीय क्रमांक कु. सृष्टी तायडे व तृतीय क्रमांक कु. मेधा चितलांगे यांनी पटकावला.  तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. सृष्टी आंबुसकर, द्वितीय क्रमांक कु. श्रद्धा फुंडकर व तृतीय क्रमांक कु. सानिका खारोडे यांचा आला.  स्व. श्रीधराव देशमुख यांच्या कन्या सौ. सुनंदा देशमुख याच्या हस्ते स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे, सन्मानचिन्हासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला परीक्षक म्हणून सौ. विमल कोरडे व डॉ. अनुजा देशमुख म्हणून लाभल्या होत्या. 


स्पर्धेनंतर दर्यापूर येथिल ख्यातनाम कलावती सौ. वैशाली चऱ्हाटे यांचा "मी सावित्री" हा लोकप्रीय एकपात्री नाट्य प्रयोगाद्वारे महिला व विद्यार्थिनींना प्रभोधन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. शिवानी कोरडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. प्रमोद देशमुख, श्री. ज्ञानेश्वर कोरडे, पुरषोत्तम सोनोने सह समस्थ निंबा ग्रामवासीयांचा सहभाग लाभला.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या