महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अकोला द्वारा लोक संचालित साधन केंद्र अकोट अंतर्गत जागतिक महिला दिन साजरा
आज दिनांक 8 मार्च 2022 रोजी गजानन नगर अकोट येथे महिला आर्थिक विकास महामंडळ माविम अकोला द्वारा लोक संचालित साधन केंद्र अकोट अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या प्रकल्प अंतर्गत *जागतिक महिला दिन* साजरा करण्यात आला. त्या मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. माया म्हैसने मॅडम यांनी बचत गटातील महिलांना अमूल्य असे मार्गदर्शन करत मुलींना शिक्षण तसेच रोजगार विषयी माहिती दिली. यामध्ये लोक संचालित साधन केंद्र अकोट चे व्यवस्थापक मा. श्री. अमर इंगळे सर यांनी महिलांना बचत गटाचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गट अंतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्या विषयी विविध योजनांची माहिती दिली.
तसेच बँक लींकेज चे महत्व समजावून सांगितले. या कार्यक्रमात लेखापाल मा. मनिष बोरोडे सर तसेच NULM क्षेत्रीय समन्वयक सौ. नेहा शेंदुरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन गृहस्वामिणी महिला बचत गटातील महिलांनी केले व सूत्रसंचालन मा. भगत मॅडम यांनी केले. व आभार प्रदर्शन पुंडकर ताई यांनी केले.
0 टिप्पण्या