जागतिक महिला दिनानिमित्त युवती मेळावा व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
वर्षभर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून पक्षा मध्ये काम करत असताना मोर्चे, आंदोलनं, सत्याग्रह, उपोषणं,बैठका, निवेदने सोबतच जिल्हाभर दौरे करून तालुका कार्यकारिणी, सर्कल कार्यकारिणी, बुथकमेट्या स्थापन करणे, आढावा बैठका घेऊन मार्गदर्शन करने तसेच पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कुठेही कमी पडू नये या करिता सतत प्रयत्नशील राहाने या सर्व तान तनावा मधून एक दिवस विरंगुळा मिळावा म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून युवती मेळावा व महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्षा वंदनाताई वासनीक होत्या.उद्घघाटन प्रदेश महासचिव अरुंधती ताई शिरसाट यांनी केले. जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट यांनी प्रास्ताविक केले.पश्चिमच्या महासचिव मंतोषताई मोहोड यांनी सुत्रसंचलन केले तर पूर्वच्या महासचिव सुवर्णा जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.
सतत चार तास महिलांनी कथ्थक, लावणी अशी एकापेक्षा एक बहारदार नृत्ये सादर केली तसेच वेशभूषा व सुरेल गीतांचा सुध्दा नजराणा दिला नृत्या मध्ये कांचन हिवाळे,कोमल वानखेडे, विपश्यना गोपनारायन यांना क्रमशः तीन बक्षिसे देण्यात आली गीतां करिता मंदाताई शेखर, चैताली आठवले, तेलगोटे ताई शीवणी यांना क्रमशः तीन बक्षिसे देण्यात आली.वेशभुसे मध्ये सहा सहभागी युवतींना बक्षिसे देण्यात आली.
जि.प. अध्यक्षा प्रतिभा ताई भोजने, जि.प. सदस्या पुष्पाताई इंगळे, जि.प. सदस्या संगीताताई अढाउ, जि.प. सदस्या
निताताई गवई, नगरसेवक किरण ताई बोराखडे , प्रतिभाताई अवचार यांनी सुध्दा मनोगता मधून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकारी व महानगर कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी पर्यंत मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या