माई तुझ्या आठवणीत
आज क्रांतीज्योती सावित्री माई चा स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो पण माई चे विचार समाजात रुजले पण पचले का? स्त्रियांनी सावू माय च बलिदान विसरता कामा नये स्त्री शिक्षण देऊन अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेऊन सृजनशील समाज निर्माण करण्याचा माईचा निर्धार आम्ही स्त्रिया शिकलो. आम्ही सावित्री माई वाचतो त्यांचे विचार समाजात रुजले पण पचले नाहीत असं मी म्हणेन ते कसे आमच्यात अंधश्रद्धा अजूनही आहेत . आमच्यात लिंगभेद आहेत . आम्ही कर्मकांड करतो. आम्ही वैचारिक गुलाम आहोत. आमच्यात तोंड देण्याची क्षमता नाही.
बोटावर मोजणार्या उच्च शिक्षित व वैचारिक सृजनशील असलेल्या माझ्या भगिनी बद्दल मी बोलत नाही .तर ज्या 40 टक्के महिला ग्रामीण व शहरी भागात आहेत जेव्हा प्रत्यक्ष दर्शी काम करत असताना आलेले अनुभव बघून अस सांगावस वाटते की अजूनही आम्ही जी पुरुषसत्ताक वैचारिक गुलामी स्वतः वर लादून घेतली त्या पगड्यातून बाहेर पडण्यास तयार नाही. याची किती तरी उदाहरणे देता येतील मुलगा हवा म्हणून स्त्रीच्या जीवाशी खेळून तिला लिंग परीक्षण करून मुलगा जन्मास घालण्यास भाग पाडले जाते व माझी भगिनी त्याच समर्थन करते तेव्हा मला सावू माई ची आठवण होते माई तुम्ही परत या स्त्री दस्यत्वाच्या बेड्या तोडण्यास हो माई मला तुमची आठवण येते जेव्हा जाती पातीवर चर्चा होते. हो माई मला आठवण येते जेव्हा एका विधवेवर बुरसटलेल्या विचारांच्या नराधमाच्या वखवखलेल्या नजरा तिच्या कडे असतात कटू असेल पण सत्य आहे हो माई मला तुमची खूप आठवण येते जेव्हा एक स्त्री सुद्धा दुसऱ्या स्त्री ला समजून न घेता तिच्याशी स्पर्धा इर्षा व शत्रुत्व करते हो माई माई तुम्ही परत या एकदा तुमच्या लेकिना न्याय देण्यासाठी तिला सर्वतोपरी सक्षम करण्यासाठी माई माझं हृदय खूप भरून आले समाजातील विषमता बघून म्हणून माई तुम्ही या तुमच्या लेकिना आर्थिक वैचारिक सृजनशील घडवण्यासाठी सावित्रीच्या लेकी शिकल्या पण अजून ही त्या कुंडली बघून विवाह करतात .
कर्मकांड अंधश्रद्धेला बळी पडतात व बुआ बाजी ला बळी पडतात आम्ही शिकलो मोठ्या झालोत पण आम्ही वैचारिक सृजनशील नाही झालो आम्ही शिक्षण घेतले पण त्यात आम्ही तुमच्या विचारांचा खून केला आम्ही माई सांगतो पण आम्हाला माई चे विचार जगता आले नाही. ते जगता आले पाहिजे म्हणून स्त्रियांनी आर्थिक वैचारीक व सृजनशील विचारांनी घडलं पाहिजे असे नमूद करावे वाटते ,मी काही कमी किंवा जास्त लिहिलं असेल तर मला लहान समजून माफ करा परंतु जे वास्तव मी अनुभवलं ते लिहिलं आहे
माई तुमची खूप आठवण येते
कॉम्रेड संध्या पाटील
0 टिप्पण्या