Ticker

6/recent/ticker-posts

वात्सल्यादिनी रक्तदान शिबीराचे उद्‌घाटन !

वात्सल्यादिनी रक्तदान शिबीराचे उद्‌घाटन !             


कारंजा : स्थानिक सरस्वती भवन, श्री गुरुमंदिर संस्थानजवळ कारंजा येथे, प.पू . १०८ आचार्य श्री आर्यनंदी महाराज यांच्या जन्मदिन सोहळ्यानिमित्त, श्रीमती यमुनाबाई सैतवाळ दिगंबर जैन धर्मदाय ट्रस्ट कारंजा तथा अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था शाखा कारंजाच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, सदर रक्तदानाला आज रविवार दि27/03/2022 रोजी सकाळी ९:०० पासून प्रारंभ झालेला आहे . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अ . दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे महामंत्री मुकूंद वाढचाळे हे होते तर प्रमुख अतिथी डॉ . अमेय दानखेडे, डॉ . विवेक बुडे, संत गाडगेबाबा रक्तपेढी बडनेराचे डॉ कविमंडन सर, एड . संदेश जिंतुरकर, डॉ . सुशिल देशपांडे इ. होते . 


सुरुवातीला व्यासपिठावरील पाहुण्यांचे हस्ते वात्सल्यदिनानिमित्त प पू आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले . तसेच कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबाच्या प्रतिमेचे सुध्दा पूजन व हारार्पण करण्यात आले . व युवा रक्तदात्यांचे रक्तदान शिबीर सुरु करण्यात आले . बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्तपेढीचे वतीने रक्त संकलन करण्यात येत असून, रक्तदात्यांना आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येत आहे . रक्तदान शिबीर सुरु असून,तरी जास्तित जास्त दानशूर रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे .कार्यक्रमाकरीता धनंजय फुरसुले, धर्मराज महात्मे, प्रकाश सरोदे, राजु फुरसुले, दिपक फुरसुले, प्रमोद कहाते, धनंजय डोळस, सुनिल डाखोरे, राहुल महात्मे, प्रकाश सरोदे, दिपक फुरसुले, धनंजय डोळस, सुनिल डाखोरे, राहुल महाले, सचिन भेलांडे, सचिन फुरसुले, पवन उरळकर, प्रज्वल गुलालकरी, रमेश वानखडे, पत्रकार संजय कडोळे, उमेश अनासाने इ अथक परिश्रम घेऊन मित्रमंडळींचे रक्तदान करून घेत असल्याचे कार्यक्रमाचे प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र ग्रामिण साप्ताहिक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाला कळवीले आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या