सामाजिक वनीकरण रोपवाटिकेतील बोगस रोप निर्मिती शोधून दोषीवर कारवाई करण्याचे मागणी
अकोला सामाजिक वनिकरण विभागाच्या बाळापूर परिक्षेत्रातील वाडेगाव(डॉ.बाबासाहेब आंबेडकर) रोपवाटिकेत व्रुक्षलागवडीसाठी रोपनिर्मिती केली जाते. ही रोपवाटिका मनरेगा तर्फे कार्यान्वित असून या योजनेत काम करणाऱ्या जाँबकार्ड धारक स्थानिक मजुरांना रु.248/- रोजदराने बँक खात्यातुन मजुरी दिली जाते. या रोपवाटिकेत सांकेतिक क्र. 1823015/dp/1235061810 अन्वये २०x३० पिशवी मधील 20000 रोपे तयार केली जात असून दुसरी कोणतीही योजना प्रस्तावित नाही. या योजनेला क्र.4 2021-22 मंजुरी मिळाली असून ही रोपनिर्मिती 710128 सात लाख दहा हजार ऐकशे अठ्ठावीस रु. मंजुर निधीने 9 महिने कालावधीत करावयाची आहे. यातील 60 टक्के रु. 427000 मजुरी (अकुशल) व 40 टक्के रु. 243000 मटेरियल वर खर्ची पडणे अंदाजित आहे. ही योजनेवर पूर्व खर्च म्हणून रु 97475/- मटेरियल विकत घेण्यात आले असून याचे पेमेंट होणे बाकी आहे. या कामावर दि.29.1.2022 पासून सुरुवात होऊन सतत 7 आठवाड्यापासून सरासरी 8 मजुर रोज काम करित आहेत. हे मजुर वाडेगाव येथीलच असून मंजुर मस्टर नुसार त्यांची नावे व जाँबकार्डे खालील प्रमाणे आहेत.
क्र. नाव जाँबकार्ड नंबर
1) शरद सरप 643
2) कल्पना वाडकर 1843
3) ललिता मानकर 2241
4) छाया बावणे 3251
5) प्रमिला मानकर 3600
6) मुक्ता खराटे 4085
7) सुनिता बावणे 4448
8) लता वाडकर 5076
ही रोपवाटिका वाडेगाव येथील प्रभु रामचंद्र तायडे कार्ड- 811 हे मजुर साभाळत असून फक्त यांनाच महाराष्ट्र शासनाच्या नाविण्यपूर्ण योजनेची रोजंदारी मजुरी दिली जाते. जी दैनंदिन रु. 387 ईतकी आहे.
महत्वाची बाब म्हणजे या रोपवाटिकेत जरी 20,000 रोपनिर्मितीचे काम सुरु असले तरी येथे मंजूर योजने व्यतिरिक्त 29000 मोठी वाढलेली रोपे असून 20000 मिश्र प्रजातीचे रोपे 9000 पुर्ण मुदत वाढीचे बांबू रोपे आहेत. ही रोपे 2019 च्या 33 कोटी किंवा नंतरच्या 4 कोटी व्रुक्षलागवड योजनेत लावण्यासाठी तयार केली असता प्रत्यक्षात न लावता फक्त कागदावरच लावली दर्शवून योजना 120 टक्के सफल दाखवून शासन व जनतेच्या डोळ्यात धुळ फेकण्यात आली.
"आईजीच्या जिवावर बाईजी उदार" या प्रमाणे मनरेगा योजना निधीत ही कामे फुकटात करवून घेत 29000 मोठी रोपे ज्यावर शासकीय बजेट नुसार जवळपास 30 लाख निधी नाविन्यपूर्णच्या योजनेत खोटी मानसे बनावटी मस्टर, बिले द्वारे काढून पदाच्या अधिकारा नुसार टक्केवारीने हडप केल्या जाईल.( मनरेगा व नाविन्यपूर्ण योजना मजुरी दरामध्ये रु. 139 ऐवढी तफावत आहे) वनविभाग (प्रादेशिक) व सामाजिक वनीकरण अकोला विभागाचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे उप वनसंरक्षक श्री अर्जुना के.आर. (भा.व.से.) ज्यांनी मागील पंधरवड्यात तेल्हारा सामाजिक वनीकरणाच्या RFO चिलकर व RO कटगळे यांना व्रुक्षलागवडी मधील भ्रष्टाचारी अनियमितेसाठी निलंबित केले ते या महा भ्रष्टाचारा बाबतीत दोषींवर काय अँक्शन घेणार हे कळेलच.
0 टिप्पण्या