वंचित चषक चा समारोप व बक्षिस वितरण
अकोला येथील यशवंत भवन समोरच्या मैदानात वंचित बहुजन आघाडी चषक २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांनी मैदानात फलंदाजी करून केले होते. सदर चषक चे आयोजक सतिशभाऊ वानखडे व नियोजन समिती राजकुमार शिरसाट,आकाश गवई, नागेश नाईक,विक्की दामले,संदीप खंडारे,ad. सतीश जंजाळ,मयुर इंगळे व K.P.L. च्या सर्व सदस्यांनी केले होते. सदर चषकला अकोला,अमरावती,बुलढाणा, वाशीम जिल्ह्यातील ३२ संघ सहभागी झाले होते. यांपैकी अरहान रॉक 11 व ए. आय. सी. 11 या संघात अंतिम सामना खेळण्यात आला त्या मधे अरहान रॉक 11 संघ विजयी झाला.
सदर चषक च्या प्रमुख उपस्थितीत अशोकरावजी सोनोने,राजेंद्रजी पातोडे,अरुंधती ताई शिरसाठ, प्रमोदभाऊ डेंडवे, प्रभाताई शिरसाठ, प्रतिभाताई भोजने,पुष्पाताई इंगळे,वंदनाताई वासनिक,ज्ञानेशवरभाऊ सुलताने गजानन गवई,राहुलजी अहिरे, मुकुंदजी गायकवाड यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक व संदीपभैय्या पंजवानी, परागभाऊ गवई,शेख शमशु भाई,सुरेंद्र भाऊ तेलगोटे, नितेश किर्तक,अमोल शिरसाठ, सचिन शिराळे, मंदाताई शिरसाठ, मंगलाताई शिरसाठ, सुरेखा ताई सावदेकर, यांच्या हस्ते द्वितीय पारितोषिक देण्यात आले.
सदर चषक चे प्रथम बक्षिस ५१००० रु. (एक्कावन्न हजार रुपये) व द्वितीय बक्षिस २१००० रू. (एकवीस हजार रुपये) होते. दोनही बक्षिसे विजय संघाना मंचावर देण्यात आले.
0 टिप्पण्या