Ticker

6/recent/ticker-posts

प्रादेशिक परिवहन विभागाची खाजगी बसेसवर कार्यवाही

प्रादेशिक परिवहन विभागाची खाजगी बसेसवर कार्यवाही



अकोला एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संप कालावधीत खाजगी बसेसला प्रवासी वाहतूकीस परवानगी देण्यात आली. खाजगी बसेसव्दारे सणासुदीच्या काळात प्रवाशाकडून मनमानी भाडे आकारुन प्रवाशाची लुट होवू नये याकरीता प्रादेशिक परिवहन विभागाव्दारे मोहिम राबविण्यात येत खाजगी बसेस अव्वाच्या सव्वा प्रवाशांकडून भाडेवाढ करीत आहे पैसा गोळा करीत आहे. 


गेल्या सहा महिन्यापासून एसटी बसचा संप सुरू असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे दहावी बारावीची परीक्षा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वर्सेस मुळे आणखीनच भुर्दंड पडत आहे. या सर्व गैरप्रकारावर आळा भरण्यासाठी अकोला पोलीस यांनी ही विशेष मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत खाजगी बसेच्या बुकींग सेंटर व 47 खाजगी बसेसवर धाडी टाकून तपासण्या करण्यात आल्या. त्यात 14 खाजगी बसेस यांना प्रतिवेदन देवून 98 हजार रुपयांचे दंड वसूल करण्यात आले. ही मोहिम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरिक्षक संदीप तुरकने व अभिजीत ताले यांनी राबविली.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या