Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना चा वतिने एक दिवशीय पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना चा वतिने एक दिवशीय पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न



कारंजा [लाड ]- महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने,स्थानिक शांतीनगर येथील, श्री गुरुदेव सेवाश्रम येथे आज दि.20/03/2022 रोजी, पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा  संपन्न झाली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विचारपीठावर बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील, प्रमुख मार्गदर्शक - राज्य सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार एड .सुधाकर खुमकर, पुण्यनगरीचे अकोला जिल्हा प्रतिनिधी अनिल माहोरे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, पत्रकार संघाचे जिल्हा प्रभारी बंडूभाऊ इंगोले यांची उपस्थिती होती.यावेळी  बहुजन पत्रकार संघ ज्या विचारधारेवर चालतो ते महापुरुष छत्रपती शिवराय, महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून असलेले, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी मनोगत व्यक्त करून कार्यशाळेचे उद्घाटन केले व बहुजन पत्रकार संघाच्या सर्व सभासदांना प्रशासकीय मदत करण्याचे आश्वासन दिले. 


यावेळी बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम  आवारे पाटील यांनी आपल्या पहिल्या सत्रात पत्रकारिता आणि पत्रकार या पुढील आव्हाने, बातमी तंत्र, बहुजन पत्रकारांची महाराष्ट्राला गरज आदी विषयावर सखोल मांडणी करून करंजा बहुजन पत्रकार संघाचे सभासदांना योग्य मार्गदर्शन केले. एड. सुधाकर खुमकर यांनी क्राइम पत्रकारिता, क्राईम बातम्या, पत्रकारांनी साठी असलेला संरक्षण कायदा, पत्रकारांपुढे असलेली आव्हाने, पत्रकारांची आज असलेली अवस्था आदि विषयावर सखोल मांडणी करून चिंतन करणारे मार्गदर्शन केले .


 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष धोंगडे  यांनी प्रास्ताविक एकनाथ पवार यांनी तर  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे यांनी मानले. समारोपीय सत्रामध्ये बहुजन पत्रकार संघाच्या अध्यक्ष आरीफ पोपटे , उपाध्यक्ष एकनाथ पवार ,सचिव गणेश बागडे संघटक अशिष धोंगळे, कोषाध्यक्ष प्राध्यापक शेकुवाले, कार्याध्यक्ष दादाराव बहुटे ,सहसचिव मोहम्मद लक्ष्मण मुन्नीवाले ,रामदास मिसाळ जकाखान ,प्रभाकर सोमकुवर, विनोद नंदागवळी ,कालूभाई तवंगर, उषा नाईक, मयुरी गुप्ता, महेंद्र गुप्ता, दिगंबर सोनवणे ,पवन कदम ,संकेत वावगे ,महादेव कोठडे ,राजेश वानखेडे राहुल गावडे, राजेश भगत ,हरदीप पिंजरकर ,रमेश देशमुख ,मयूर राऊत, संतोष दगडे, जिनवर तायडे ,मतीन खान, गालीफ पटेल, संदीप कुर्हे, हेमंत पापडे, राजेंद्र शामसुंदर ,रमेश वानखडे, विलास खपली, संजय लोखंडे, विलास इंगळे ,शेषराव वरठी,अब्दुल अलिम, शेख हकीम ,अनुप पाठे आदि पत्रकारांचा अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील आवारे यांनी सन्मानपत्र देऊन  सत्कार केला . असे वृत्त संजय कडोळे यांचेकडून देण्यात आले आहे .


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या