फ्लॉरेन्स नाइटिंगेल महिला सोहळा निकषाप्रमाणे लवकरात लवकर साजरा करण्यात यावा
आज माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. तसेच खालील विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. फ्लॉरेन्स नाइटिंगेल सोहळा निकषाप्रमाणे लवकरात लवकर साजरा करण्यात यावा कोणालाही डावलण्यात येऊ नये. दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजनेचा लाभ प्रथम नियुक्ती दिनांक पासूनच देण्यात यावा. दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अंतर्गत एम.एस.सी.आय.टी चि अट ठेवण्यात येऊ नये. तसेच उपकेंद्राचे रूपांतरण cho जॉईन झालीत तेव्हापासून आरोग्य वर्धनी उपकेंद्रात झालेले आहेत, तरी""" टीम बेस इन्सेंटिव्ह"""(1500 ru.) गेल्या दोन वर्षापासून आज रोजी पर्यंत संपूर्ण पंधराशे रुपये प्रमाणे देण्यात यावेत. तसेच विस्तार अधिकारी प्रमोशन व आरोग्य पर्यवेक्षिका प्रमोशन याची सेवाजेष्ठता यादी लावण्यात आलेली नाही तरी लवकरात लवकर लावण्यात यावी.
तसेच दर माहे जानेवारी महिन्यात सर्व कर्मचारी निहाय सेवा जेष्ठता यादी लावण्यात येणे अपेक्षित आहे तीसुद्धा लावण्यात आलेली नाही तर लवकरात लवकर लावण्यात यावेत. दर पाच तारखेच्या आत पगार व्हावेत व प्रमोशन करत असताना कोणालाही डावलण्यात येऊ नये. ही सुध्दा सकारात्मक चर्चा करण्यात आली कार्यक्रम लवकरात लवकर साजरा करणार आहेत असे आश्वासन माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांनी दिले. तसेच लवकरात लवकर टीम बेस इन्सेंटिव्ह सुद्धा सर्वांना मिळणार आहे हे सुद्धा आश्वासन दिले आणि वरील सर्वच मुद्दे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील हे सुद्धा आश्वासन माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांनी दिले.
0 टिप्पण्या