Ticker

6/recent/ticker-posts

एल.आर.टी. काॅमर्स काॅलेज मधिल परिसरात आग

एल.आर.टी. काॅमर्स काॅलेज मधिल परिसरात आग


सिवील लाईन चौक जवळील एल.आर.टी. काॅमर्स काॅलेज मधिल परिसरात आग लागली आणि मोठ्या प्रमाणात वस्तूंचं नुकसान झाले आहे. पण सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. कॉलेज परिसरात आजू-बाजूला फळांचे हातगाड्या, ज्यूस सेंटर व इतर फेरीवाले नेहमीच असतात, त्यांच्यामार्फत होत असलेला कचरा जसे नारळ पाणी, ज्युस मधील राहिलेला कचरा, हा कॉलेजच्या परिसरामध्ये फेकल्या जातो व त्याला पेटवून दिल्या जाते, याच कारणामुळे या परिसरामध्ये कचरा पेटवून दिल्यामुळे आग वणव्यासारखी पेटली होती. हा धक्कादायक प्रकार झाल्याची माहिती काॅलेज कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. यामध्ये जवळपास कुठलेच नुकसान झाले नाही. घटनेची माहिती मिळताच, पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन अग्नीशमन पथकाला आगीवर नियंत्रण मिळवता आले. अन्यथा मोठा अनर्थ होऊन आग आटोक्यात आणणं कठीण झालं असतं.


 यामुळे जिवीत हानी वा आर्थीक नुकसान झालं असतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कारण काॅलेज परिसरात मधे आज 12 वी. चा पेपर होता, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण खरीच ठरली, असे म्हणावे लागेल.
झालेल्या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी विकृत घटना करणाऱ्या विरोधात तपास घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या