Ticker

6/recent/ticker-posts

ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांना श्रध्‍दांजली

ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांना श्रध्‍दांजली 


अकोला 
ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांचे आज दुःखद निधन झाले, त्‍याबद्दल    माजी  केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ .  यांनी तिव्र दुःख व्‍यक्‍त केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्‍चे शिवसैनिक अशी त्‍यांची ओळख होती. वयाच्‍या ८१ व्‍या वर्षी राहत्‍या घरी त्‍यांचे निधन झालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्‍थापना केल्‍यानंतर श्री. सुधीर जोशी यांनी शिवसेना वाढीसाठी बाळासाहेबांसोबत मोठं काम केलं. 


१९७२ मध्‍ये ते मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदार संघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा-शिवसेना युती सरकारच्‍या कार्यकाळत त्‍यांनी महसुल व शिक्षण मंत्री म्‍हणून काम पाहिले होते त्यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली अशा शब्दात खासदार संजय धोत्रे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

आ. रणधीर सावरकर यांनी स्‍व. सुधीर जोशींबद्दल आठवणी  युती शासनाच्‍या काळात मंत्री म्‍हणून . अतिशय मनमिळावू व निगर्वी व्‍यक्‍तीमत्‍वाचे श्री. सुधीर जोशी धनी होते, असेही आ. रणधीर सावरकर   म्‍हणाले. आमदार गोवर्धन शर्मा यांनी जोशी कुटूंबियांना या दुःखातुन सावरण्‍याची शक्‍ती परमेश्‍वर त्‍यांना देवो अशी प्रार्थना करून त्यांनी मुंबई तसेच मराठी माणसासाठी केलेली कामगिरी मोलाची असल्याची सांगून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. तसेच जिल्हा भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चनाताई मसने तेजराव थोरात, कुसुम भगत, आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या