Ticker

6/recent/ticker-posts

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री निर्णयाचा अकोला भाजपकडून निषेध

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री निर्णयाचा अकोला भाजपकडून निषेध 


अकोला- राज्यातील शहरांमध्ये असलेल्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा अकोला भाजपकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.


      संत, महात्म्यांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला बदनाम करणारा हा निर्णय असून महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न असल्याचा घणाघात अकोला भाजप जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केला आहे.


     आर. आर. आबा पाटील यांच्या सारख्या नेत्यांनी महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. अनेक संत व राष्ट्रपुरुष यांनी महाराष्ट्राच्या व्यसनमुक्तीसाठी महान कार्य केलेले आहे. आणि आता त्याच महाराष्ट्रात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री चा निर्णय घेऊन महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप अकोला भाजपकडून करण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करून जनतेने अशा चुकीच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न हाणून पाडावे, असे आवाहन अकोला भाजपकडून करण्यात आले.


अकोला
संत महात्मा पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार किराणा दुकान सुपर बाजार मध्ये वाईन विकण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्राला  बदनाम करण्याचा षड्यंत्र रचले असा आरोप आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल यांनी केला आहे.
सुसंस्कृत महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला बदनाम करण्याच्या दृष्टीने शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीने घरोघरी वाईन विकण्याचा धंदा  सुरू करून सर्वांना नाद लावून  मद्यराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत असून एकीकडे व्यसनमुक्तीसाठी आर आर पाटील सारखे नेते संत गाडगेबाबा सारखे राष्ट्रपुरुष यांनी कार्य महाराष्ट्रात केले असताना असा प्रकार शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार करत असून या प्रकारचा प्रत्येक नागरिकांनी निषेध व्यक्त करावा व महाराष्ट्राच्या सुसंस्कृती पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडावा असे आवाहन भाजपा तर्फे करण्यात आले


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या