श्री रामनवमी शोभायात्रा समिती ची कोर कमिटीची बैठक संपन्न
अकोला
श्रीराम नवमी शोभायात्रा समिती श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळाच्या वतीने सामूहिक विवाह व सर्वांचा कल्याण व्हावा यासाठी सिद्ध करू राम लेखन वही माध्यमातून घरोघरी सर्वांचा सामाजिक आर्थिक क्षेत्रात विकास व्हावा ही मनोकामना पूर्ण व्हावी मनोकामना पूर्ती व्हावी काशी येथील लेखन पुस्तिकेत जमा करण्याचा निर्णय समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी जाहीर केला.
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने दहा एप्रिल रोजी येत असून त्याची पूर्वतयारीसाठी श्री रामनवमी शोभायात्रा समिती ची कोर कमिटीची बैठक समितीचे अध्यक्ष विलास अनासने यांच्या निवासस्थानी झाली त्यामध्ये समितीचे अध्यक्ष विलास अनासने यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निराधार आत्महत्याग्रस्त शेतकरी, covid-19 मुळे झालेल्या भारता पुरुषाच्या निधनामुळे झालेल्या मुलींच्या लग्न सामूहिक करण्याचा निर्णय समितीमध्ये घेण्यात आला, तसेच सिद्ध करून वेदिक मंत्राने सर्वांच्या कल्याणासाठी राम लेखन वही विशिष्ट अनुष्ठान करून ही पुस्तिका अयोध्या व काशी येथे लेखन स्तंभामध्ये जमा करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे तसेच परिस्थिती पाहून शोभायात्रा व विस्तार व सर्वसमावेशक बैठक लवकर घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय समितीच्या वतीने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामकाजासंदर्भात माहिती गिरीश जोशी यांनी दिली समितीने एकशे दोन जणांना शिलाई मशीन दिली दोन वर्षात अन्नदान रामप्रसाद औषध वाटप शिक्षणाचे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहे तसेच सांस्कृतिक जयंती हे कार्यक्रम समितीच्यावतीने करण्यात आले हीच परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत करण्यात आला.
सध्याच्या परिस्थितीमध्ये गरीब होतकरू तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी covid-19 च्या निधन पावलेल्या करता पुरुषाच्या परिवारालापरिस्थिती बरोबर नसेल तर त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी समिती पुढाकारही सामूहिक विवाह च्या माध्यमातून अशी घोषणा आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली असून यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहकार्य घेऊन समिती प्रभू रामचंद्रांना अभिप्रेत कार्य अविरतपणे सुरू होण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत आमदार गोवर्धन शर्मा विलास अनासने, ब्रिजमोहन चितलांगे, अनिल मानधने गिरीराज तिवारी, अजय शर्मा रुपेश जयस्वाल सारिका देशमुख हेमंत शर्मा पुष्पाताई वानखडे,मनीषबाछुका, नितीन जोशी मोहन गुप्ता नवीन गुप्ता राम ठाकूर संदीप वाणी नीलेश निनोरे , रेखा नालट मनीषा भुसारी कल्पना अडचुले गीतांजली शेगोकार मालती रणपिसे सारिका देशमुख , मनीषा अनासने, टोनी जयराज, संतोशी शर्मा, रमेश अलकरी निलेश बयस प्रवीण मानकर आदी उपस्थित होते गरजवंतांना समितीकडे संपर्क साधावा अशी आव्हान विनंती करण्यात आली आहे
0 टिप्पण्या