Ticker

6/recent/ticker-posts

अकोला येथील कु. नेहा खोत हिला अमरावती विद्यापीठ तर्फे रजत पदक

अकोला येथील कु. नेहा खोत हिला अमरावती विद्यापीठ तर्फे रजत पदक 



अकोला : स्थानिक जुने शहर निवासी नेहा श्यामराव खोत हिने नुकत्याच जाहीर झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.ए. संगीत परीक्षेत संपूर्ण विद्यापीठातून तृतीय स्थान प्राप्त केले असून ती रजतपदकाची मानकरी ठरली.



या दैदीप्यमान यशात तिला आर.डी.जी. कॉलेजच्या संगीत विभाग प्रमुख मार्गदर्शक डॉ.अर्चना अंभोरे, प्रो. घननीळ पाटील, मदन खुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल नेहा खोत हिचे विठ्ठल मंदिर अखंड हरीनाम सप्ताह मंडळाचे सर्वसेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा व व्यवस्थापक रमेश अलकरी यांनी अभिनंदन करून कौतुक केले.




अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या