Ticker

6/recent/ticker-posts

फडणवीस यांच्या वक्तव्याचा एम आय एम ने केला निषेध

फडणवीस यांच्या वक्तव्याचा एम आय एम नेकेला निषेध






विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी टिपू सुलतान यांच्या अवमान करणारे वक्तव्य केल्याचा आरोप अकोला येथील एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी करून फडणीस यांच्या प्रतिकात्मक फोटोला चपलांचा हार घालून नारेबाजी करत आंदोलन केले. अकोल्यातील स्थानिक फतेह अली खान चौकात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फडणीस यांच्या वक्तव्यावरून आंदोलन केले. यावेळी त्यांनी टिपू सुलतान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद अशा जोरदार
घोषणा दिल्या.

तसेच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे टिपू सुलतान यांच्या
विषयीचे विचारही यावेळी मांडले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य सामाजिक एकता बिघडवणारे आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या