Ticker

6/recent/ticker-posts

दहावी-बारावी परीक्षा लांबणीवर, आता मार्च महिन्या ऐवजी एप्रिल मधे होणार परिक्षा

दहावी-बारावी परीक्षा लांबणीवर, आता मार्च महिन्या ऐवजी एप्रिल मधे होणार परिक्षा


अभ्यास व सरावासाठी विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी!!!

इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च ऐवजी एप्रिल महिन्यात होण्याची चिन्हे आहे. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय बदलली आहे. लिखाणाचा सरावात खंड पडल्याने परीक्षेत अडचणी येऊ शकतात. लिखाणाचा सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी थोडा अनधी मिळावा, अशी जोरदार मागणी होत आहे.


याची दखल शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. त्यामुळेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलाव्यात, असे मा. बच्चूभाऊ कडू यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. उपसंचालकांची आज ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली आहे.

शिक्षण विभागाकडून डिसेंबर महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार, इयत्ता बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या दरम्यान होणार आहे.यासंदर्भातील घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या दिवशी कोणता पेपर होईल, याचे विस्तृत वेळापत्रक आज प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या अभ्यासाचे अचूक नियोजन करता येणार आहे.



 बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा

या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. मार्च येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवडयात जाहीर होईल.


दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी / अंतर्गत गुण

इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी / अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या