Ticker

6/recent/ticker-posts

पंजाबमधील काँग्रेस सरकारने देशाच्या मा पंतप्रधानांच्या सुरक्षेशी केलेली तडजोड हे निषेधार्य-सचिन देशमुख

•पंजाबमधील काँग्रेस सरकारने देशाच्या मा पंतप्रधानांच्या सुरक्षेशी केलेली तडजोड हे निषेधार्य-सचिन देशमुख•


मूर्तिजापूर-आंतरराष्ट्रीय नेतृत्व व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेशी केलेली तडजोड ही पंजाबच्या काँग्रेसी सरकारची विकृती असून अश्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे असे वक्तव्य भाजयुमो अकोला जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी केले.

काल पंजाब मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंजाब मध्ये झालेल्या करोडो रुपयांच्या विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमाला गेले असता त्यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार तर्फे निष्काळजी पणा केल्याने पंतप्रधानांच्या जीवाला धोका निर्माण झाला दैवी आशीर्वादाने व 130 कोटी भारतीयांच्या सदिच्छा पंतप्रधान मोदींसोबत असल्यामुळे मोठा अनर्थ टळला परंतु देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत हलगर्जी पणा करणाऱ्या पंजाब काँग्रेसी सरकारचा आज माजी केंद्रीय मंत्री खा.संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व भाजप जिल्हाध्यक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर,आ.गोवर्धनजी शर्मा,आ.हरीशभाऊ पिंपळे,आ.वसंतजी खंडेलवाल,आ.प्रकाशजी भारसाकळे,तेजरावजी थोरात,विजयजी अग्रवाल,भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील,भाजप मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष भूषणजी कोकाटे,भाजप मूर्तिजापूर शहर अध्यक्ष रितेशजी सबाजकर यांच्या सुचनेनुसार आणि भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,युवा मोर्चा मूर्तिजापूर शहर अध्यक्ष हर्षल साबळे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्पू मुळे पाटील यांच्या नेतृत्वात भाजयुमो मूर्तिजापूर तर्फे कँडल मार्च काढून निषेध नोंदविण्यात आला.यावेळी बोलताना सचिन देशमुख यांनी पंजाब राज्य सरकार च्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.


यावेळी कमलाकर गावंडे,पप्पू मुळे,हर्षल साबळे,गजानन नाकट,अमोल पिंपळे,बबलू भेलोंडे,प्रवीण लोकरे,राहुल गुल्हाने,आशिष गुंजाळ,अतुल इंगोले,राम जोशी,विलास सावळे,कुलदीप सदार,मनोज गुप्ता,अविनाश यावले,सचिन खडतरकर नुपेन अरोरा,आकाश गवारे,राणा सोळंके,आकाश जाधव,आकाश गोडाले,कुणाल हजारे,सुधीर दुबे,योगेश फूरसुले,अमित नागवान,लकी अग्रवाल,चेतन सरदार,राम खंडारे,लखन आरोरा,अर्पित गावंडे,हर्षद लोहिकपुरे,संदीप जळमकर,लखन मिलांदे,रोहित बजाज,आकाश सायघन,अभिषेक श्रीवास,प्रमोद टाले,प्रमोद अवघाते,ज्ञानू महामुने,गणेश ठाकरे,राहुल अग्रवाल,गंफु शर्मा व संपूर्ण भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

स्वर्थासाठी राष्ट्रीय सुरक्षा वेठीस आणणाऱ्या पंजाब सरकार चा काँग्रेसचा कॅन्डल व  निषेध व्यक्त करून सरकार बरखास्तीची मागणी •



अकोला
 भारतीय जनता युवा मोर्चा अकोला महानगर च्या वतिने   खासदार संजय धोत्रे , भाजपा  जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर,आमदार गोवर्धन शर्मा, भाजपा शहरअध्यक्ष विजय अग्रवाल ,आमदार वसंत खंडेलवाल, महापौर अर्चनाताई म्हसने यांच्या मार्गदर्शनाखाली ,भाजयुमो शहराध्यक्ष उमेश गुजर यांच्या नेतृत्वात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाबमध्ये ताफा अडविल्या प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नाकोटा करण्याचा प्रकार करून पंतप्रधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्या त्याचाही निषेध करण्यात आला चुकीच्या गोष्टीचा समर्थन करणे व त्यासंदर्भात काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी एकही शब्द बोलत नाही यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते अशा सर्व तत्त्वांचा व पंतप्रधान यांचा अपमान करणाऱ्या वृत्तीचा जाहीर निषेध करण्यात आला व पंतप्रधानांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली
काँग्रेस शासित प्रदेशात आज जे गलिच्छ राजकारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत खेळल्या गेले हे अतिशय लाज घालवणारे आहे. 
पंजाबमधील काँग्रेस सरकारला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा माहीत असतांना सुद्धा त्याबाबत माहिती देऊन मोदींचा ताफा एका ब्रीज वर अर्धा तास अडकवला जातो हे अत्यंत घोर चुक आहे. राजकारणातील प्रतिस्पर्धीला हरवल्या जात नसेल तर त्याच्या जीवावर उठून खालच्या पातळीवर वर जाऊन राजकारण करणं ह्या त्यांच्या जुन्या परंपरेला शोभेल अस कृत्य काँग्रेसने केलं आहे. देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न खालिस्तान वाद यांच्यासोबत काँग्रेस करत आहे त्याला समर्थन देणारे त्यांचे पक्ष यांचा सुद्धा निषेध प्रत्येक राष्ट्र भक्तांनी करावा त्यांच्या सोबत असणाऱ्या सत्ताधारी पक्ष यांची मानसिकता लक्षात येत आहे  . भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह व   विरोधात त्यांनी संघर्ष केला लोक नायक जयप्रकाश नारायण चौक इथे भाजपातर्फे कॅण्डल माज काढून घोषणाबाजी करून   काँग्रेसचा व पंजाब सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 
आंदोलनात युवा मोर्चा महानगर सरचिटनीस उज्वलजी बामनेट, अभिजीतजी बांगर,निलेशजी काकड़ मंडल अध्यक्ष भूषणजी इंदौरिया, अभिषेकजी भगत, टोनीजी जयराज, वैभवजी मेहरे , रितेशजी जमनारे , केशवजी हेडा व मयूर शर्मा , नितिन राउत , ऋषिकेश श्रीवास्तव , विकी भीसे ,अमोल गीते, आदित्य वानखडे, यश सेकासरीया व युवा मोर्चा चे सर्व पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थिति होते.पंतप्रधानाचा अपमान व त्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रत्येक हिंदुस्थानी नागरिक चिंतेत असून अशा कृतीचा प्रत्येकाने निषेध व्यक्त करून देश विभाजन  नेण्याच्या काँग्रेसच्या वृत्तीचा निषेध व्यक्त करण्यात आला


केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजना असंघटित कामगारांना सुरक्षाकवच 



अकोला
केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजना असंघटित कामगारांना सुरक्षाकवच देण्याच्यादृष्टीने विश्वकर्मा कार्ड च्या माध्यमातून नोंदणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे त्या माध्यमातून विविध योजना च्या घोषणा सरकारकडून करण्यात आले आहे या योजनेचा समाजातील असंघटित कामगार सुपारी भाजीपाला विक्रेता दुकानात काम करणारे मोलमजुरी करणारे मोलकरी छोट्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना लाभ होण्यासाठी ही योजना असून या योजनेचा ई कार्ड श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीच्यावतीने दिनांक सात जानेवारी व आठ जानेवारी रोजी स्थानिक परशुराम चौक खोलेश्वर येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे शिबिर covid-19 च्या पार्श्वभूमीचा पालन करून करण्यात येत असल्याची माहिती समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिली.
श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती समिती धर्म अध्यात्म अध्यात्म ज्ञान दोन्ही धार्मिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य तसेच पीडितांना मदत देण्याचा काम सातत्याने करीत असते श्री रामनवमी शोभायात्रा समितीने covid-19 च्या पार्श्वभूमीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम तसेच अन्नदान, त्यांना मदत देण्याचे काम सातत्याने करत असते सर्वसामान्यांना आधार मिळावा केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने श्री रामनवमी शोभायात्रा समितीने आज दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आमदार गोवर्धन गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने  नगरसेविका उषा विरक कपिल राजदेव  विलास अनासने, हरीश आलम चंदानी, ब्रिजमोहन चीतलांगे अशोक गुप्ता महादेव हुडपुडे, अजय शर्मा जानवी डोंगरे गिरीश जोशी संजय गोडफोडे संतोष पांडे आदींच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे कार्यक्रम स्थळी गर्दी होऊ नये यासाठी नोंदणीसाठी वेगवेगळी व्यवस्था टोकन व्यवस्था करून दादा पण आधार कार्ड नोंदणी करण्यात येणार आहे अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करा   
  

                                                                        भाजपा चे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांची मागणी 
अकोला                           
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे , अशी मागणी     यांनी  केली. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवण्याच्या षडयंत्राची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.       
अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर भाजपा  महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल  म्हणाले की  पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी पंजाबमध्ये जे काही घडलं ते अत्यंत गंभीर होतं. या घटनेचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत आहे. या घटनेची राष्ट्रपतींनी गंभीर दखल घेतली पाहिजे. देशात वेगवेगळया पक्षांची , आघाड्यांची सरकारे आली होती.  राज्यात आणि केंद्रात अनेकदा वेगवेगळया पक्षांची सरकारे देशाने पाहिली आहेत. मात्र पक्षीय द्वेषापोटी देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षा व्यवस्थेशी घातक खेळ आजवर कोणीच केला नव्हता.  पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची योजना  केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणा  परस्परांशी समन्वय ठेवून आखत असतात. पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेला राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेकडून सहकार्य मिळणे अपेक्षित असते. मात्र पंजाबातील  घटनाक्रम पाहिला तर असे लक्षात येईल की, पंतप्रधानांच्या मार्गावर जाणीवपूर्वक आंदोलनाला परवानगी दिली गेली. आंदोलकांमुळे पद्धतशीरपणे रस्ता बंद होईल याची दक्षता घेतली गेली. जेथे हे घडलं तेथून पाकिस्तानची सीमा अतिशय जवळ आहे. पंतप्रधानांचा जीव  जाणीवपूर्वक धोक्यात आणण्यासाठी केली गेलेली ही खेळी होती. 
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुका ही देशाच्या दृष्टीने  अत्यंत नामुष्कीची गोष्ट असते . सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. या घटनेसंदर्भात कॉंग्रेस नेत्यांनी अतिशय निर्लज्ज प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान हा देशाचा असतो , कोण्या एका पक्षाचा नसतो.एवढी घटना घडूनही मुख्यमंत्री प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होत नाहीत , ही लाजीरवाणी गोष्ट आहे. खालच्या पातळीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही आमदार सावरकर, अग्रवाल   यांनी नमूद केले.

वसंत मदनलाल खंडेलवाल यांना आज आमदार म्हणून शपथविधी 


अकोला
अकोला बुलढाणा वाशीम स्थानिक स्वराज्य संस्थेत विधान परिषद निवडणुकीमध्ये नेत्रदीपक विजय प्राप्त करून मतदारांचा विश्‍वास सार्थ करणाऱ्या वसंत मदनलाल खंडेलवाल यांना आज आमदार म्हणून शपथविधी विधीमंडळात सभापती राम राम राजे निंबाळकर यांनी दिली
शपथ घेतल्यानंतर वसंत मदनलालजी खंडेलवाल यांनी मतदारांनी दिलेला विश्वास सार्थ करण्यासाठी व भारतीय जनता पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी करू असा विश्वास व्यक्त केला. सर्व जाती धर्म पंथाचा मतदारांनी आपल्याला त्यांच्या भावना व समस्या निराकरणासाठी विधिमंडळात पाठवल्या ते सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले


ईश्वर कृपेने व केंद्रीय सुरक्षा एजन्सीच्या सतर्कतेमुळे पंतप्रधान सुखरूपपणे विमानतळावर पोहोचले


अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हमला करण्याचा व त्यांच्या सुरक्षेमध्ये चूक करण्याचा महापाप काँग्रेसच्या इशाऱ्यावर पंजाब सरकारने केला. ईश्वर कृपेने व केंद्रीय सुरक्षा एजन्सीच्या सतर्कतेमुळे पंतप्रधान सुखरूपपणे विमानतळावर पोहोचले त्यांच्या कार्यक्रमावर व त्यांच्या कापीला थांबवण्यासाठी साठी  खालिस्तानी संघटनेने 80 लाख रुपये बक्षीस घोषित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय नेते असून देशाच्या विकासासाठी व राष्ट्रीयत्वाची सातत्याने प्रयत्नशील राहणारे  कोटी जनतेला आपला परिवार मान मानणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी महामृत्युंजय जप अकोला भारतीय जनता पार्टी महिला आघाडीने संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात प्रभू रामचंद्र आणि महादेवांच्या साक्षीने तीन तास अकराशे महामृत्युंजय जप करण्यात आला यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल, सुहासिनी ताई धोत्रे गंगादेवी शर्मा, मंजुषा ताई सावरकर, पुष्पाताई खंडेलवाल सुनीताताई अग्रवाल चंदाताई शर्मा अर्चना ताई शर्मा महापौर अर्चनाताई मसने यांच्या मार्गदर्शनात महारुद्राभिषेक महामृत्युंजय जप महाआरती वेद पाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने करण्यात आले. पंजाब सरकार व काँग्रेसचा शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. पंतप्रधानाचा सुरक्षेमध्ये चूक करून शीख समाजाला बदनाम करण्याचा तसेच हिंदू समाजाचे संरक्षण करणाऱ्या समाजाला हिंदू समाजातून तोडण्याचा  प्रयत्न शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून करण्याचा कुटील डाव काँग्रेसने केला आहे. सुरक्षा एजन्सीने पंतप्रधान यांचा वाचवल्याबद्दल भाजपा महिला आघाडीने त्यांचे अभिनंदन केले आहे पंतप्रधानांच्या हस्ते भारत महाशक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावा यासाठी महामृत्युंजय जप करण्यात आले व अशा पद्धतीचे खालिस्तानी काँग्रेसच्या प्रयत्नाला  यश प्राप्त होऊन न होऊ देता देश अखंड महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण व्हावे अशी प्रार्थना करण्यात आली भाजपा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांच्या आदेशानुसार

   आघाडी तर्फे 6- 1-  मंदिरामध्ये महामृत्युंजय जप, भजन व आरती करण्यात आली

 सौ. सुहासिनी ताई धोत्रे, सौ.गंगादेवी शर्मा, सौ.मंजुषा ताई सावरकर,महापौर सौ.अर्चनाताई मसने, सौ. सुनीता ताई अग्रवाल सौ.अर्चना ताई शर्मा, महानगर अध्यक्ष सौ.चंदाताई शर्मा,सौ.वैशाली ताई शेळके, सौ.गितांजलीताई शेगोकार, ...

साधनाताई येवले, मनिषाताई भुसारी,मंगलाताई महेशने, रंजनाताई विंचनकर,चंदाताई ठाकूर, सारिकाताई देशमुख, सारिकाताई जयस्वाल, निशाताई कडी, जानवीताई डोंगरे, सोनलताई अग्रवाल दुर्गा जोशी नीता,बागडेताई संतोशीताईशर्मा.
 नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या